राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे पुण्यात निधन


पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला होता. त्यामुळे त्यांना  पण्यातील रुबी रुग्णालयात उपचारासाठी दखल करण्यात आले होते. भारत भालके हे 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पुत्र भगीरथ, तीन विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे. सलग तीन वेळा पंढरपूर-मंगळवेढाचे आमदार तसेच सोलापूर जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणातील मोठं प्रस्थ असलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांना पराभूत करणारे जायंट किलर असा त्यांचा परिचय होता.

त्यांची प्रकृती शुक्रवारीच चिंताजनक होती, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांची शुक्रवारी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. उपचार  सुरु असताना रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.  भारत भालके यांना कोविड-19 झाला होता. त्यातून ते बरेही झाले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे दाखल करण्यात आलं होतं. मात्र न्युमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती ढासळत गेली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (27 नोव्हेंबर) हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली होती. रात्री साडे बारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं.

अधिक वाचा  पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच व्यासपीठावर

 कायम लोकांमध्ये राहणारा अतिशय रांगडा नेता अशी भारत भालके यांची ओळख होती. डोक्यावर परिट घडीची पांढरी टोपी, पांढरा तीन गुंड्यांचा पैलवान शर्ट आणि विजार असा साधा पोशाख तसंच कायम दाढीत असणारे नाना यांची ग्रामीण बाजाची भाषा जनतेत खूप लोकप्रिय होती. बेधडक बोलणारा आमदार असा त्यांची ओळख असल्याने अधिकारी वर्गातही त्यांच्याविषयी भीतीयुक्त आदर होता. 2009, 2014 आणि 2019 असे सलग तीन वेळा भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक केली होती. 2019 विधानसभा निवडणुकी आधी काँग्रेसचे आमदार होते. भाजपकडून तिकीट मिळवण्यास ते इच्छूक होते. परंतु भाजपने तिकीट दिलं नाही म्हणून राष्ट्रवादीकडे तिकीट मागितलं. काँग्रेसने जागा राष्ट्रवादीला सोडली आणि भारत भालके राष्ट्रवादीकडून आमदार झाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love