सीरम इन्स्टिट्यूटने मागितली आपत्कालीन लस निर्मितीची परवानगी


पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला नुकतीच भेट घेऊन सीरममध्ये उत्पादित होत असलेल्या ‘कोविशिल्ड’ या कोरोनावरील लसनिर्मितीबाबत आढावा घेतला होता. त्यानंतर कंपनीचे सीइओ आदर पूनावाला यांनी पत्रकारांशी बोलताना  दोन आठवड्यात आपत्कालीन निर्मितीसाठी सरकारकडे परवानगीसाठी अर्ज करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SSI) भारताच्या ड्रग्स कंट्रोलर जनरलशी (डीसीजीआय) संपर्क साधून आपत्कालीन लस निर्मितीची परवानगी मागितली आहे. सीरमचे सीईओ आदर पूनावला यांनी ट्विटरवर तशी माहिती दिली आहे.

युकेने फायझरला आपत्कालीन निर्मितीला याआधीच परवानगी दिली आहे. युएसमध्ये देखील त्यांनी परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे.  त्यामुळे औषध निर्मात्या कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू झाली असून रुग्णांसाठी ही चांगली खबर आहे. इतर लसीच्या तुलनेत कोविशिल्डची किंमत सर्वात कमी आणि सर्वसामान्यांना परवडणारी असेल असा दावा ही कंपनीने यापूर्वी केला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  केवळ कोरोनासाठी नव्हे तर दालचिनीचे काय आहेत इतर फायदे?