अदर पूनावाला यांनी घेतला ‘कोव्हिशील्ड’ लसीचा डोस: लस सुरक्षित असल्याचा दिला संदेश


पुणे–कोरोनावरील लसीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना सिरम इन्स्टिटय़ूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी ऑक्सफर्ड-ऍस्ट्रोझेनकाच्या माध्यमातून कंपनीने बनविलेल्या ‘कोव्हिशील्ड’ या लसीचा शनिवारी डोस घेतला. याबाबत त्यांनी ट्विटरवर लस घेतानाचा फोटो शेअर केला असून, त्याद्वारे लस सुरक्षित असल्याचाच संदेश दिला आहे.

कोरोनाच्या लढय़ात देश आज महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. आज देशभरात करोना लसीकरणास प्रारंभ झाला. राज्यातही प्रत्येक जिह्यात आरोग्य कर्मचाऱयांना लस दिली जात आहे. मात्र, काही ठिकाणी करोना लसीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पूनावाला यांनी हा फोटो शेअर केला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने सिरम संस्था कोरोनाच्या लशीच्या चाचण्यांवर काम करीत आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गानंतर सिरममध्ये गेल्या काही महिन्यांपासून संशोधन सुरू होते. तीन मानवी चाचण्या झाल्यानंतर या लसीला मान्यता मिळाली आहे.

अधिक वाचा  कोरोनावरील ‘कोव्हीशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला ससून रुग्णालयात सुरुवात

लस सुरक्षित ः पूनावाला यांचा पुनरुच्चार

लसीकरण मोहिमेबद्दल मी देशवासियांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात पार पडत आहे. कोव्हिशील्डच्या यशामागे अनेकांची मेहनत आहे. या यशाचा मला अभिमान आहे. ही लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे. हा संदेश आरोग्य कर्मचाऱयांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी लस घेत आहे, असे ट्विट अदर पूनावाला यांनी केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love