रशियातील ‘स्पुटनिक व्ही’ लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना पुण्यात सुरुवात


पुणे(प्रतिनिधी)— कोरोनावरील लसीच्या निर्मितीवरून जगातील विविध कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे. भारतासह चीन, रशिया, अमेरिका, इंग्लंड अशा विविध देशांचे कोरोना लसीच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SSI) भारताच्या ड्रग्स कंट्रोलर जनरलशी (डीसीजीआय) संपर्क साधून आपत्कालीन लस निर्मितीची परवानगी मागितली आहे. दरम्यान, रशियातील ‘स्पुटनिक व्ही’ या कोरोनावरील लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना पुण्यातील नोबल रुग्णालयामध्ये सुरूवात झाली आहे.

एकुण १७ स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली आहे. या रुग्णालयासह केईएम रुग्णालयाच्या वढू येथील संशोधन केंद्रांमध्ये लवकरच तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना सुरूवात होणार आहे.गॅमेलिया नॅशनल रिसर्च सेंटर आणि रशियन डायरेक्ट इनव्हेट्मेंट फंड यांच्याकडून ही लस विकसित केली जात आहे. भारताकडूनही ही लस खरेदी केली जाणार आहे. भारतात डॉ. रेड्डीज लॅबकडून या लसीच्या मानवी चाचण्यांना काही दिवसांपासून सुरूवात झाली आहे. या चाचण्यांसाठी पुण्यातील नोबल रुग्णालय व वढू येथील संशोधन केंद्राची निवड करण्यात आली आहे. ‘नोबल रुग्णालयामध्ये गुरूवारपासून लस देण्यास सुरूवात झाली असून १७ स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  भारतीय संरक्षण दलांच्या इतिहासात नवीन अध्याय लिहिला जाणार