वंध्यत्व समस्येवर उपाय; घराच्या घरीच इन-व्हिट्रो (कृत्रिम गर्भधारणा) उपचार पद्धती In-vitro (artificial insemination)


“वंध्यत्व ही समस्या जगात सर्वत्रच आढळते. भारतात दर सहा जोडप्यांपैकी एका जोडप्याला वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.  महिलेला गर्भधारणा होण्याची शक्यता महिन्यागणिक घटत असते आणि नैसर्गिक मार्गाने अपत्यप्राप्ती करून घेण्याचा एक वर्ष प्रयत्न करून यश येत नाही हे लक्षात आल्याबरोबर वंध्यत्वावर इलाज करणा-या तज्ज्ञांचा सल्ला व उपचार घेणा-या महिलेला गर्भधारणा होण्याची शक्यता मोठी असते.  सकारात्मक विचार करणा-या  महिलेला तणावात वावरणा-या महिलेपेक्षा लवकर गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते.  “अलीकडेच झालेल्या पाहणीनुसार, ज्या महिलांच्या शरीरात अल्फा अमिलेज या एन्झाइम (रसायना) ची पातळी जास्त असेल त्यांना गर्भवती होणे अवघड जाते,” असे ओऍसिस फर्टिलिटी च्या सह -संस्थापक आणि वैद्यकीय संचालक डॉ. दुर्गा राव म्हणतात. 

अधिक वाचा  सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीच्या वैद्यकीय चाचणीची (मानवी चाचणी) भारती हॉस्पिटलमध्ये सुरवात

“ आधीच तणावाखाली असलेल्या महिलांच्या मनात कोव्हिड च्या या वातावरणात इन-व्हिट्रो (कृत्रिम गर्भधारणा) In-vitro (artificial insemination) उपचार करून घेण्याबद्दल असलेली भीती लक्षात घेऊन आम्ही अशा महिलांना त्यांच्या घरीच इन-व्हिट्रो (कृत्रिम गर्भधारणा) उपचार उपलब्ध करून देण्याची विशेष संकल्पना मांडली आहे,” असेही डॉ दुर्गा राव पुढे म्हणाल्या. 

ओऍसिस फर्टिलिटी चे Oasis Fertility क्लिनिकल हेड  डॉ  निलेश बलकवडे  म्हणाले , ही एक दूरदृष्टी ने मांडलेली अभिनव विचारसरणी आणि उपचारपद्धती आहे. यात मातृत्वाचे स्वप्न स्वतः च्या घराच्या सुरक्षित आणि तणावरहित वातावरणात राहून पूर्ण करण्याची संधी महिलांना मिळते.  मात्र इन-व्हिट्रो (कृत्रिम गर्भधारणा) उपचार हॉस्पिटल व्यतिरिक्त अन्य ठिकाणी करतांना आम्ही यासंबंधीचे नियम कुठेही मोडले जाणार नाहीत याची खबरदारी घेतली आहे.  वंध्यत्वावर तुमच्या घरीच उपचार या संकल्पनेमुळे असे उपचार घेऊ इच्छिणा-या परंतु कोविड च्या वातावरणात त्याबद्दल धास्ती घेतलेल्या हजारो विनापत्य दाम्पत्याच्या चेह-यांवर स्मित उमलेल हे नक्की. मात्र उद्दीपन, रुग्णाची देखरेख, इंजेक्शन अशा प्रक्रिया घरी होत असल्या तरी बीजांड स्वीकृती साठी संबंधित व्यक्तीला रुग्णालयात यावे लागेल हे मी स्पष्ट करू इच्छितो.”

अधिक वाचा  श्रीमंत देशांनी केली कोरोनावरची तयार होणारी 50 टक्के लस आरक्षित? काय आहे 'कोवॅॅक्स प्लॅन' (Covid-19 vaccine access plan)

ओऍसिस फर्टिलिटी चे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक किरण गाडेला म्हणाले,  ओऍसिस फर्टिलिटी दवाखान्यात  सर्वोत्कृष्ट उपचार उपलब्ध करणे आणि नवीन कल्पना विकसित करणे याबाबतीत नेहमीच पुढे असते.  कोव्हिड च्या या काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी आम्ही प्रभावी कार्यपद्धतींचा अवलंब करीत आहोत, कारण आमच्या पेशंट्स ची सुरक्षितता आमच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आम्ही सुरु केलेल्या या  आयव्हीएफ @होम  IVM@home उपचार पद्धतीमुळे पेशंट ला स्वतःच्या घरात राहून वंध्यत्वावर उपचार घेणे शक्य झाले आहे. 

असे उपचार घेणा-या व्यक्तीसाठी एक नर्सिंग मॅनेजर नियुक्त केला जाईल आणि सर्व उपचारांचा समन्वय तो करील. तज्ज्ञ डॉक्टर व्हर्च्युअल पद्धतीने रुग्णाच्या प्रकृतीची देखरेख करतील. प्रत्यक्ष औषधे / इंजेक्शन देणे तसेच आवश्यक त्या नोंदी करणे यासाठी एक परिचारिका रुग्णाच्या घरीच नियुक्त केली जाईल.

अधिक वाचा  गुड न्यूज- मुंबईत दोन आठवड्यात तर राज्यात दोन महिन्यात कोरोना नियंत्रणात येणार?

या उपचारपद्धतीची काही ठळक वैशिष्ट्ये  :

•      रुग्णाच्या घरात तणावरहित वातावरणात उपचार

•     स्पर्शरहित उपचार 

•    क्लिनिक मध्ये वारंवार येण्याची आवश्यकता नाही   

•     व्हाइट ग्लव्हज सेवा 

•    खास नर्सिंग मॅनेजर 

•   व्हर्च्युअल पद्धतीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला 

•  पूर्ण गुप्तता 

•  रुग्णाच्या गरजेनुसार उपचार (Customized)

लवचिकता 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love