#Sharad Pawar Vs Ajit Pawar : समंजस मतदार योग्य निकाल देतील : शरद पवारांचा अजित पवारांना टोला

शरद पवारांची हिंदी भाषेवर भूमिका : सक्ती नको आणि द्वेषही नको
शरद पवारांची हिंदी भाषेवर भूमिका : सक्ती नको आणि द्वेषही नको

Sharad Pawar : प्रत्येकाचा व्यक्तिगत विचार असू शकतो. भावनात्मक अपील(Pune)आमच्याकडून करण्याचे काही कारण नाही. बारामती मतदारसंघाचे (Baramati Constituency) लोक आम्हाला वर्षानुवर्षे ओळखत आहेत त्यामुळे आम्ही भावनात्मक अपील करणार नाही असे स्पष्ट करीत,ज्या पद्धतीने विरोधकांकडून भूमिका मांडली जात आहे त्यातून ते काहीतरी वेगळं सुचवत आहेत. त्याची नोंद समंजस मतदार घेतील व योग्य निकाल देतील असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष(शरदचंद्र पवार गट) शरद पवार(Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांचे नाव न घेता लगावला. (Marathi News)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात,”माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला नाही तर मी विधानसभेला वेगळा विचार करेल’, असा सज्जड दम बारामतीकरांना दिला होता. त्याबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.  

अधिक वाचा  एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत काय म्हणाले अजित पवार ?

पवार म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोणीही उभे राहू शकते.  लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभे राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.  तो अधिकार कोणी गाजवत असेल तर त्या संबंधीची तक्रार करण्याचे काहीच कारण नाही. आपण आपली भूमिका लोकांच्या समोर मांडावी.  गेली ५५  ते ६० वर्षे आम्ही काय केलं हे लोकांना माहीत आहे.  बारामतीत उभे राहिलेले ज्या संस्था आहेत,त्यामध्ये विद्या प्रतिष्ठान संस्था स्थापन होऊन ५४ वर्षे झाली आहेत तर कृषी विकास प्रतिष्ठान ही संस्था १९७१ मध्ये  स्थापन झाली आहे. त्यावेळी आज आरोप करणाऱ्यांचे वय काय होते याचे कॅल्क्युलेशन त्यांनी केले तर त्यांच्या आणि लोकांच्याही लक्षात येईल की अशा प्रकारची भूमिका मांडणी कितपत योग्य आहे.

अधिक वाचा  विकास करताना तुम्ही फक्त स्वतःचेच घर भरत राहिला तर कसे होणार? - रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचले

संघटनेचे चिन्ह किंवा पक्ष गेल्यामुळे अस्तित्व संपत नाही.

दरम्यान, ज्याने पक्ष स्थापन केला, त्याचा पक्ष काढून घेतला, असे यापूर्वी देशात कधी झाले नव्हते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निमित्ताने असे प्रथमच घडले आहे. मात्र संघटनेचे चिन्ह किंवा पक्ष गेल्यामुळे अस्तित्व संपत नाही. पुन्हा नव्या जोमाने आपण राज्यात संघटना बांधणार आहे, असा निर्धार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

पवार म्हणाले, की यापूर्वी देशामध्ये अनेकदा पक्षाच्या संदर्भात घडामोडी घडल्या. ज्याने पक्ष स्थापन केला त्याचाच पक्ष काढून घेणे, हे कायद्याला धरून वाटत नाही. त्यामुळेच आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. त्याचा योग्य निकाल लागेल, अशी अपेक्षा आहे. सामान्य माणसाशी संपर्क कायम वाढला पाहिजे. त्याला पण नव्याने काय देऊ शकतो, यावर विचार केला पाहिजे. त्यामुळे नव्याने वाटचाल करताना देखील फार अडचणी येणार नाहीत. आपण नव्या उमेदीने महाराष्ट्रात फिरून लोकांशी संपर्क साधून लोकांना भूमिका पटवून देणार आहोत. त्यामध्ये पक्ष आणि चिन्ह याची फारशी अडचण येणार नाही.

अधिक वाचा  शामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी पिंपळे गुरवमध्ये ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

चिन्हाची फार चिंता करायची नाही. आजपर्यंत मी १४ वेळा निवडणुका लढलो. त्यापैकी पाच निवडणुकांचे चिन्ह हे बैलजोडी, गाय वासरू, चरखा, हाताचा पंजा आणि घड्याळ, अशी होती. मात्र, चिन्ह काढून घेतले म्हणजे त्या संघटनेचा अस्तित्व संपेल, असे कधी घडत नाही.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love