भारताने वर्ल्ड कप जिंकला तर अॅस्ट्रोटॉकच्या युजर्सना मिळणार 100 कोटी – ‘अॅस्ट्रोटॉक’चे सीईओ पुनीत गुप्ता यांची घोषणा

If Team India Wins the World Cup Astrotalk users will get 100 crores
If Team India Wins the World Cup Astrotalk users will get 100 crores

Cricket world cup 2023 – ‘वर्ल्ड कप 2023’ मध्ये सलग 10 विजय मिळवत फायनल मध्ये पोहोचलेल्या टीम इंडियाची लढत उद्या  (रविवारी) ऑस्ट्रेलियाबरोबर रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांदरम्यान होणाऱ्या या अत्यंत उत्कंठावर्धक लढतीकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे.  अशातच ‘अॅस्ट्रोटॉक’चे सीईओ पुनीत गुप्ता यांनी मोठी घोषणा केली आहे. जर भारताने वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकली तर कंपनीकडून ‘अॅस्ट्रोटॉकच्या युजर्सना शंभर कोटी रुपयांचे वाटप करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली आहे. (If Team India Wins the World Cup on Sunday, we’re spreading the love equally among our fabulous users -punit Gupta)

पुनीत गुप्ता यांनी म्हटले आहे की, “गेल्यावेळी मी माझ्या काही मित्रांसमवेत वर्ल्ड कपचा आनंद लुटला होता.  मात्र यावेळी माझ्यासोबत माझे युजर्स आहेत ते सुद्धा माझ्या मित्रांसारखेच आहेत.  त्यामुळे त्यांच्याबरोबर आनंद लुटण्याची माझी इच्छा आहे.  आज सकाळी मी माझ्या फायनान्स टीम सोबत चर्चा केली आणि आपल्या युजर्सला 100 कोटी रुपयांचे वाटप करण्याची शपथ घेतली.  जर भारत वर्ल्ड कप जिंकला तर युजर्सला त्यांच्या वॉलेटमध्ये पैशांचं वाटप केले जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नच राहणार का? न्यूझीलंड बरोबरचा हा आहे इतिहास..

एस्ट्रोटॉक ही एस्ट्रोलॉजीच्या ऑनलाइन बिझनेसमध्ये पहिलीच टेक कंपनी आहे. सन 2020 मध्ये ही कंपनी प्रॉफिटमध्ये आली. पुनीत गुप्ता यांच्या एस्ट्रोटॉकने सन 2023 मध्ये 282 कोटी रुपयांचा बिझनेस केला. त्यातून 27 कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love