लोणावळा येथील शिबिरास कॉँग्रेसच्या अनेक आमदारांची दांडी : कारणे दाखवा नोटिस बजावणार

Many MLAs of Congress marched to the camp in Lonavala
Many MLAs of Congress marched to the camp in Lonavala

Nana Patole: 2014 पासून सत्तेवर असलेल्या भाजपाचे(BJP) विकासकामांकडे वा दिलेल्या आश्वासनांकडे लक्ष नाही. ईडी(ED) व इन्कम टॅक्ससारख्या(Income Tax) संस्थांचा वापर करीत पक्ष फोडण्याचे व आमदार(MLA) पळवापळवीचे कामच सध्या भाजपा करीत आहे. मात्र, येत्या निवडणुकीत जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देईल, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी शनिवारी येथे केला. पक्षाला कोणतीही कल्पना न देता शिबिरास गैरहजर राहणाऱया आमदारांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार असल्याचा इशाराही पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला(Ramesh Chennithla) यांनी या वेळी दिला. 

 लोणावळा शहरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ((Traning Camp) दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा शनिवारी समारोप झाला. शिबिरात बूथ लेव्हलपासून संघटना बांधणी कशी करायची, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच खोटे बोला पण रेटून बोला, हा भाजपचा खोटारडेपणा जनतेसमोर जशास तसे उत्तर देऊन उघडा करण्यात येणार असून देशात प्रामाणिक व सर्वधर्मसमभाव असणारी व्यवस्था निर्माण व्हावी, याकरिता प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. ते म्हणाले, 2014 साली नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथे ‘चाय पे चर्चा’ करताना स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे, सत्ता आल्यावर पहिली सही शेतकरी कर्जमाफीची करण्याचे, शेतातील उत्पन्न दुप्पट करण्याचे तसेच शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याची आश्वासने दिली व देशभरातील शेतकऱयांची मते मिळवली. मात्र, सत्तेत आल्यानंतर यासर्व गोष्टींचा त्यांना विसर पडला, आज शेतकरी आंदोलन करत असताना त्यांच्या रस्त्यावर खिळे मारण्याचे काम, त्यांच्यावर लाठीहल्ले, अश्रूधुराचा संस्थांचा वापर करत पक्ष फोडण्याचे व आमदार पळवण्याचेही काम भाजपाकडून आहे. प्रथम भ्रष्टाचाराचे आरोप करायचे व नंतर त्यांना सोबत घ्यायचे, जनतेचे प्रश्न मांडणाऱयांवर हल्ले करायचे, अशी ही हुकूमशाही आहे. 

अधिक वाचा  भाजपचा गुंडांना राजकीय आश्रय : आमदार रवींद्र धंगेकर यांची आरोप

 दांडीबहाद्दरांना कारणे दाखवा नोटीस 

काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर लोणावळय़ात असताना अनेक आमदारांनी याकडे पाठ फिरवली. या प्रश्नाचे उत्तर देताना नाना पटोले म्हणाले, अनेक आमदारांनी पक्षाला याबाबत कल्पना दिली होती. ज्यांनी कल्पना दिली नाही, न सांगता गैरहजर राहिले, त्यांना पक्षाकडून करणे दाखवा नोटीस देण्यात येणार असल्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले. ही संघटनेची बैठक आहे, या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love