Nanand-Bhavjay to compete for Baramati Lok Sabha?

#Supriya Sule Vs Sunetra Pawar : बारामती लोकसभेसाठी नणंद- भावजय येणार आमणे सामने?

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

Supriya Sule | Sunetra Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) बारामती मतदारसंघात(Baramati Constituency) राष्ट्रवादी शरद पवार(Sharad Pawar) गटाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या(NCP) उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) यांना उतरविले जाण्याची शक्यता आता अधिक ठळक होऊ लागली आहे. मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या नावाचा फिरविण्यात येणारा चित्ररथ, कुल कुटुंबीयांशी त्यांची झालेली भेट यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले असून, नणंद- भावजय आमणे सामने येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. (Nanand-Bhavjay to compete for Baramati Lok Sabha?)

बारामती हा राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मागच्या तीन टर्मपासून येथे सुप्रिया सुळे या निवडून येत आहेत. मात्र, गेल्या आठेक महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून हा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गट व शरद पवार गटातील शीतयुद्धास सुरुवात झाल्याचे दिसत आहे. सुप्रिया सुळेंविरोधात अजितदादा गटाकडून सुनेत्रा पवार यांना उतरविले जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीकोनातून ‘एकच ध्यास, सर्वांगीण विकासाचा ध्यास’, असा उल्लेख असलेला सुनेत्रा पवार यांच्या नावाचा चित्ररथ मतदारसंघात सध्या फिरविला जात आहे. त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांनी भेटीगाठींवर भर दिला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी घेतलेली दौंडच्या कुल कुटुंबीयांची भेट चर्चेचा विषय ठरली होती. त्यातच अजित पवार यांनी शुक्रवारी बारामतीतील कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांच्यावर थेट निशाणा साधल्याचे दिसून आले. नुसते सेल्फी काढून उपयोग नाही. संसदरत्न पुरस्कारापेक्षा लोकांमध्ये जाऊन काम करणे महत्त्वाचे आहे, असा टोला त्यांनी लगावला होता. तसेच माझा उमेदवार नवखा असला, तरी माझ्याकडे बघून मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यामुळे सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील, याला दुजोरा मिळाल्याचे मानले जात आहे. 

 दरम्यान, सुप्रिया सुळे यांनीही यासंदर्भात मतप्रदर्शन केले आहे. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे, असे स्पष्ट करतानाच संसदेतील भाषणे वा संसदरत्न पुरस्कारासंदर्भातील अजितदादांची विधाने बालीश असल्याची टीका सुळे यांनी शनिवारी केली. त्यामुळे बारामतीतील वातावरण सध्या चांगलेच तापल्याचे दिसत आहे. निवडणूक जवळ येईल, तसा पवार विरुद्ध पवार हा संघर्ष आणखी टीपेला पोहोचण्याची चिन्हे आहेत. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *