पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा आता पूर्णवेळ : अजित पवार

राजकारण शिक्षण
Spread the love

पुणे–राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये १ फेब्रुवारीपासून शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. पुण्यातही शाळा सुरू झाल्या आहेत. पण पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा या अर्धवेळ भरवल्या होत्या. आता त्या पूर्णवेळ भरतील असे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुण्यातील कोरोना अद्याप संपलेला नाही. कारण अजूनही सक्रिय बाधितांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एक दोन आठवड्यांनंतर निर्बंधांबाबत निर्णय घेऊ, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.

आज पुण्यात अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी ही त्यावेळी माहिती दिली. कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे, पण मृत्यूच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. पुण्यासह राज्यात, देशात आणि जगात हा ट्रेंड दिसून येत आहे. ५  ते १८  वयोगटातील मुलांना देण्यासाठी जेवढी लस हवी, तेवढी उपलब्ध नाही. त्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क करणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले.

कोणताही घोटाळा पुण्यातील जंबो कोविड सेंटरमध्ये झालेला नाही. विरोधी पक्षातील लोक आरोप करतात, पण पुढे त्याच काय होते. अनेकदा माफी मागुन मोकळे होतात, असे अजित पवार म्हणाले. टीईटी परिक्षेतील गैरव्यवहारात सुशील खोडवेकरला अटक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यानी याची माहिती घेतली आहे. माहिती घेणे हे मुख्यमंत्र्यांचे काम असल्याचे पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर पुण्यातील येरवडा भागातील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. या घटनेबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला देखील या अपघाताबाबत अहवाल देण्यास सांगण्यात आल्याचे पवार म्हणाले.

दरम्यान, सध्या जंबो कोवीड सेंटर उभे आहे, पण त्यामध्ये रुग्ण नाहीत. पण, तरीही 28 फेब्रुवारीपर्यंत ते सुरु ठेवण्यात येतील. त्यानंतर याबाबत निर्णय घेऊ कारण त्यासाठी भाडे द्यावे लागते, असे पवार यांनी सांगितले. पुण्यातील कोरोना संपला असे अद्याप म्हणता येणार नाही. कारण अजूनही 45 हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे एकदोन आठवड्यांनंतर निर्बंधांबाबत निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *