ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अंगावर पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे–पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मंचर-पारगाव रस्त्यावर मेंगडेवाडी हद्दीत शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अंगावर पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. याबाबत ट्रॅक्टर चालकाविरुद्ध मंचर पोलीस स्टेशनमध्ये मध्ये फिर्याद दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निरगुडसर येथील महादू वळसे यांच्या शेतातील ऊस तोडणी करून, माल ट्रॅक्टरमध्ये भरून जिजाबाई दुधवडे व भिमाबाई गांडाळ या दोघी बहिणी माघारी निघाल्या होत्या. त्यानंतर ट्रॅक्टर शेताच्या बांधावरून वळसे मळा ते गण्या डोंगर भागात आल्यानंतर मेंगडेवाडी रस्त्याच्या तीव्र उतारावर ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टर मध्ये बसलेल्या दोघी बहिणीच्या अंगावर भरलेल्या उसाची गाडी पडली. या अपघातात दोन्ही बहिणी दबल्याने एकीचा जागेवर मृत्यू झाला व दुसऱ्या बहिणीला उपचारासाठी ॲम्बुलन्सच्या मदतीने मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं. परंतू तोपर्यंत तिचाही मृत्यू झाला होता.

मंचर पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. अवसरी ते मेंगडे वाडी रस्त्यावर गेल्या दोन-तीन वर्षांपासून जागो जागी मोठंमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे वाचवताना मोटारसायकल व इतर छोट्या मोठ्या वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा तालुक्याच्या पूर्व भागात हा भाग पोडतो. परंतू वारंवार विनंती केल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी खड्डे बुजवण्याची तसदी घेत नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *