मनसेचे जे पदाधिकारी महायुतीविरोधात प्रचार करतील त्यांच्यावर कारवाई होणार : अमित ठाकरेंचा इशारा

Action will be taken against MNS officials who campaign against the Grand Alliance
Action will be taken against MNS officials who campaign against the Grand Alliance

पुणे– देशात पुन्हा मोदी सरकार येणार आहे. मोदी सरकारला ३०० च्या आसपास जागा मिळतील. राजसाहेबांनी कार्यकर्त्यांचा विचार करुनच बिनशर्त पाठिंब्याचा निर्णय घेतला असणार असे सांगतानाच लोकसभा निवडणुकीत मनसेचे जे पदाधिकारी महायुतीविरोधात प्रचार करतील त्यांच्यावर कारवाई होणार, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, महायुतीच्या उमेदवारासाठी स्वतः राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकत्रित शिवाजी पार्कवर समारोपाची सभा होण्याची शक्यता असल्याचेही  अमित ठाकरे यांनी सांगितले.

मनसे अध्यक्ष राजे ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर बुधवारी पुणे लोकसभा  भाजप-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी अमित ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. सोबतच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभेची रणनीती कशी असावी आणि मनसेचा कसा सहभाग असेल याबाबत सविस्तर अमित ठाकरे आणि मुरलीधर मोहोळ यांची चर्चा झाली. त्यानंतर अमित ठाकरे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला

अधिक वाचा  अतिवृष्टीचा इशारा : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर

यावेळी अमित ठाकरे यांनी मुंबईतील लोकसभेच्या जागांबाबतही बोलताना सांगितले की, उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला मुंबईत एकही जागा मिळणार नाही. त्यांच्याविरोधात वातावरण आहे. अमोल किर्तीकर खिचडी घोटाळ्यामुळे वादात अडकले आहेत. त्यामुळे मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा फटका बसू शकतो. राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर भाजप लोकसभेला मनसेसाठी एक जागा सोडेल, अशी चर्चा होती. अशा परिस्थितीत दक्षिण मुंबईतून अमित ठाकरे लोकसभा निवडणूक लढवतील, असे सांगितले जात होते. मात्र, राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर ही शक्यता मावळली.  

राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदींची मुंबईत एकत्र सभा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची मुंबईत एकत्र सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने प्रत्यक्ष प्रचारात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अधिक वाचा  बीएसजीच्या सहकार्यातून पुण्यातील एचडीएफसी शाळेत उभारणार एसडीजी क्लब

वसंत मोरेंना पंतप्रधान व्हायचे आहे

पुण्यातील मनसेचे फायरब्रँड असलेले नेते वसंत मोरे यांनी अलीकडेच पक्षाला रामराम ठोकला आहे. ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. याविषयी अमित ठाकरे यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, वसंत मोरे यांना पंतप्रधान व्हायचं आहे. ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत. त्यांनी मनसेकडून पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा राज साहेबांचा आदेश पाळावा आणि महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love