संघ शिक्षा वर्ग – तृतीय वर्षाचा आज नागपुरात शुभारंभ


नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने  संघ शिक्षा वर्गाचा  तृतीय वर्षाचा शुभारंभ नागपूर येथील  रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात  झाला. रा.स्व. संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून वर्गाचे उद्घाटन केले. 

याप्रसंगी रा. स्व. संघाचे अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख तसेच वर्गाचे पालक अधिकारी मंगेशजी भेंडे देशभरातील सर्व प्रांतांमधून आलेल्या शिक्षार्थींना संबोधित करताना म्हणाले,’संघाच्या प्रणालीत तृतीय शिक्षा वर्गाचे महत्त्व अधिक आहे. येथे येणाऱ्या शिक्षार्थींची भाषा वेगवेगळी असली तरी हृदय एक आहे. त्यामुळे संवाद साधण्यात कुठलीही अडचण येत नाही,  हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. संघ शिक्षा वर्ग हा गंगोत्रीप्रमाणे आहे. गंगेतून कुणी कितीही पाणी घेतले तरी ते संपत नाही. त्याचप्रमाणे शिक्षा वर्गातून जितके ज्ञान घ्याल तितके कमीच आहे. शिक्षार्थ्यांची स्वतःचे विचार, कार्य यावर श्रद्धा असायला हवी. श्रद्धा आणि समर्पणासह साधना करत प्रत्येक शिक्षार्थीने संघाच्या कल्पनेतील कार्यकर्ता होण्याचा संकल्प करावा.’ असेही ते म्हणाले. याप्रसंगी सहसरकार्यवाह रामदत्तजी, सहसरकार्यवाह मुकुंदजी उपस्थित होते.

अधिक वाचा  #Sadabhau Khot: शेतकऱ्याचा बाप हाच एक विद्यापीठ असतो : आमच्या बापाच्या विद्यापीठामध्ये शिकायला या - कोणाला म्हणाले सदाभाऊ खोत?

१९२७ मध्ये पहिल्या संघ शिक्षा वर्गाचे आयोजन मोहिते वाडा, नागपूर येथे करण्यात आले होते. चाळीस दिवसांच्या त्या वर्गात एकूण १७ शिक्षार्थींचा समावेश होता. यंदाच्या वर्गात एकूण ७३५ शिक्षार्थी सहभागी झाले आहेत. वर्गाचे पथसंचलन २१ मे २०२२ रोजी सायंकाळी होईल. तर वर्गाचा समारोप २ जून २०२२ रोजी होणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love