मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भिषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू


पुणे– मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) खोपोली (khopoli) एक्झिटजवळ गॅसचा टॅकर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने विरुद्ध लेनवर जाऊन पलटी झाला. यावेळी समोरून येणारी वाहने टॅकरला धडकल्याने झालेल्या भिषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

सागर जनार्दन देशपांडे (रा. सेक्टर २१, प्राधिकरण निगडी, पुणे), योगेश धर्मदेव सिंग (रा. पार्श्वनाथ प्रतिष्ठान, शिवतेजनगर, चिखली पुणे) व अन्य एक जण अशा तीन जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेला गॅसचा टॅकर क्र. (NC 01N 9134) च्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टॅकर मुंबई हून पुण्याकडे जाणार्‍या लेनवर पलटी झाला. यावेळी समोरून आलेली कार क्र. (MH 01 CJ 5446) व कार क्र. MH 01 CT 3434) ह्या सदर टॅकरला धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये निष्पाप तीन जणांचा हकनाक जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अधिक वाचा  अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान -सुप्रिया सुळे

अपघाताची माहिती समजल्यानंतर बोरघाट पोलीस यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था यांनी घटनास्थळी धाव घेत मयत व्यक्तीना गाडीतून बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात गॅस लिकेज झाला नाही. प्राॅपोलिन गॅस सदर टॅकरमध्ये होता. केमिकल एक्सपर्ट धनंजय गिध यांनी स्पाॅटवर भेट देत टॅकरची पाहणी केली. अग्नीशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य करत अपघातग्रस्त वाहने बाजुला करत वाहतूककोंडी सोडविण्यात आली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love