प्रतीक्षा संपली : उद्या दहावीचा ऑनलाईन निकल : असा पहा निकाल

महाराष्ट्र शिक्षण
Spread the love

पुणे –  बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. मात्र, दहावीच्या निकालाची प्रतिक्षा संपली  असून उद्या (शुक्रवार) दिनांक २ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर  केला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाची अधिकृत घोषणा त्यांच्या संकेत स्थळावर केली आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने  दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.दहावीचा निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती.मात्र,आता निकालाची तारीख जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांची उत्कंठा अधिकच वाढली आहे. येत्या २  जून रोजी निकाल जाहीर झाल्यावर  विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे. 

  विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या लिंकवर निकाल पाहण्यास उपलब्ध असेल 

१. www.mahresult.nic.in

२. http://sscresult.mkcl.org

३. https://ssc.mahresults.org.in

४ https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board

५. https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-10th-rrsult-2023

६. http://mh10.abpmajha.com

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *