पुणे शहरात पुन्हा निर्बंधात वाढ: काय आहे नवीन नियमावली?


पुणे—महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिति निवळल्यानंतर अनलॉक करण्यात आले आहे. मात्र, काही शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढीस लागळ;ए आहे तर कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोका वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने पुन्हा निर्बंधात वाढ केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापिलाकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी नवी नियमावली जारी केली आहे.

काय आहे नवी नियमावली?

1) अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने दररोज दुपारी चार पर्यंत सुरु राहतील.

2) अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त असलेले सर्व दुकाने हे सोमवार ते शुक्रवार दुपारी चार पर्यंत सुरु राहतील.

3) मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह पूर्णपणे बंद

4) रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. दुपारी चार नंतर आणि शनिवार-रविवारी पार्सल सेवा सुरु ठेवण्यास मुभा.

अधिक वाचा  वेळेच्या बंधनांविरोधात व्यापारी महासंघाच्या वतीने ३ ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन

5) लोकल ट्रेनमधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी, अत्यावश्यक सेवेतील, शासकीय कर्मचारी, बंदरे सेवा, विमानतळ सेवा यांना प्रवास करण्यास परवानगी

6) उद्याने, खुली मैदाने, चालणे, सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत सुरु राहील.

7) सर्व खासगी कार्यालयांमध्ये फक्त 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक, तसेच कार्यालये फक्त संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.

8) शासकीय कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरु राहतील.

9) सर्व आऊटडोअर स्पोर्ट्स सकाळी पाच ते नऊ या दरम्यान सुरु राहतील.

10) सामाजिक, धार्मिक आणि मनोरंजनाचा कार्यक्रम फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी. कार्यक्रम फक्त 3 तासांचा असावा. याशिवाय या ठिकाणी खाद्यपदार्थाचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

अधिक वाचा  होळी आणि धुळवड साजरे करण्यास बंदी

11) धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद. फक्त पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी परवानगी

12) लग्नासाठी 50 लोकांची परवानगी

13) अंत्यसंस्कार, दशक्रियाविधी किंवा त्याच्याशी संबंधित कार्यक्रमांसाठी फक्त 20 लोकांना परवानगी

14) कामगारांची राहण्याची व्यवस्था असेल त्याचठिकाणी बांधकाम सुरु राहील.

15) कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे आणि त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालांची विक्री करणारे दुकाने, गाळे हे आठवड्यातील सातही दिवस संध्याकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहणार.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love