परांजपे बिल्डर्सच्या परांजपे बंधूंना अटक

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे : पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना मुंबईच्या विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खोटी कागदपत्र बनवून नातेवाईक महिलेचा विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे आणि शशांक परांजपे या दोघा बंधूंना मुंबई पोलिसांनी त्यांच्या पुण्यातील राहत्या घरातून ताब्यात घेतले.

विलेपार्ले पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात वसुंधरा डोंगरे नावाच्या 70 वर्षीय महिलेने तक्रार दिली होती. परांजपे बंधू हे पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांना ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. शशांक पुरुषोत्तम परांजपे (वय, 59) आणि श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे (वय, 63) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. विलेपार्ले पोलीस ठाण्यात या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वसुंधरा डोंगरे यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार सीआर नं. 492/2021 कलम 476, 467, 68, 406, 420 व 120 (ब) कलमान्वये गुन्हा नोंद केली आहे.पोलिसांनी राहत्या घरातून घेतले ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या परांजपे कुटुंबातील आहेत. मुंबईतील विलेपार्ले येथे परांजपे यांच्या काही जागा आहेत. ती जागा विक्री करण्यात आली. फिर्यादी या जागेच्या वारस आहेत. मात्र, फिर्यादीला कळू न देता ही जागा विक्री केली. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली होती. याबाबत आज दुपारी विलेपार्ले पोलीस ठाण्यात खोटे दस्ताऐवज बनवून, तसेच विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार त्यांना विलेपार्ले पोलिसांच्या पथकाने रात्री पुण्यातील राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *