Malabar Gold & Diamonds inaugurates 7th store at Wakad

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे वाकड येथे ७ व्या स्टोअरचे उद्घाटन

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- देशातील प्रसिद्ध सोने आणि हिऱ्यांच्या किरकोळ विक्री साखळीपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने, पुण्यात वाकड येथे त्यांचे नवीन स्टोअर नुकतेच सुरू केले. जी-५१, फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम, सयाजी हॉटेलच्या मागे, वाकड, पुणे येथे असलेल्या या आलिशान स्टोअरने पुण्यातील मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या किरकोळ व्यापाराला बळकटी दिली आहे आणि शहरातील स्टोअरची संख्या ७ वर नेली आहे.(Malabar Gold & Diamonds inaugurates 7th store at Wakad)

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, चिंचवडच्या आमदार श्रीमती अश्विनी जगताप यांनी मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे प्रमुख व्यवस्थापन अधिकारी, क्षेत्रीय प्रमुख (पश्चिम विभाग) श्री. फनजीम अहमद आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्टोअरचे उद्घाटन केले. वाकड स्टोअर हे मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे पुण्यातील ७ वे आणि पश्चिम विभागातील ३४वे स्टोअर आहे.

तब्बल २,००० चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेल्या वाकड येथील या स्टोअरमध्ये पारंपारिक, समकालीन तसेच वधूसाठी आभूषणे आणि सोने, हिरे, मौल्यवान रत्ने व प्लॅटिनममधील वजनाने हलके दागिने उपलब्ध आहेत. माइन डायमंड ज्वेलरी, एरा अनकट डायमंड ज्वेलरी, डिव्हाईन इंडियन हेरिटेज ज्वेलरी, एथनिक्स हँडक्राफ्टेड अँटिक ज्वेलरी कलेक्शन आणि प्रिसिया प्रिशिअस जेमस्टोन ज्वेलरी आणि झौल लाइफस्टाइल ज्वेलरी आणि विराज्की यांसारख्या अप्रतिम कलेक्शनसह मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या लोकप्रिय उप-ब्रँड्सचे दागिने देखील हे स्टोअर प्रदर्शित करते. अतुलनीय डिझाइनच्या विविधतेव्यतिरिक्त, स्टोअर आपल्या ग्राहकांना जागतिक दर्जाचा खरेदी अनुभव देखील देते.

वाकड स्टोअरच्या शुभारंभप्रसंगी भाष्य करताना मलाबार समूहाचे अध्यक्ष श्री. एम. पी. अहमद म्हणाले, आम्ही वाकड येथील आमच्या नवीन स्टोअरच्या प्रस्तुती आणि अनावरणाबद्दल खूपच उत्सुक आहोत. या स्टोअरमुळे पुण्याशी असलेला आमचा संबंध आणखी मजबूत झाला आहे. सर्वाधिक पसंतीची सराफ पेढी म्हणून मलाबार गोल्ड अँड डायमंड्स हे नाव घराघरात पोहोचवल्याबद्दल मी महाराष्ट्रातील लोकांचे आभार मानू इच्छितो. नवीन स्टोअरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दागिने खरेदीदारांना गुणवत्ता आणि किंमतींमध्ये अतुलनीय पारदर्शकतेसह सेवा देण्यावर आमचे निरंतर लक्ष राहिल. दागिने खरेदी करण्याच्या विलक्षण अनुभवासाठी वाकड येथील आमच्या नवीन स्टोअरला भेट देण्यासाठी आम्ही सर्वांचे स्वागत करतो.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *