‘लिली’ कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनचा वापर करण्यास केंद्र सरकारची मान्यता

आरोग्य राष्ट्रीय
Spread the love

नवी दिल्ली- भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. त्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अद्याप कुठलेही औषध उपलब्ध नाही. त्यावर लसीकरण हा सध्याचा उपाय आहे. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे कोरोनाला प्रतिबंध करणे अद्यापही पाहिजे तेवढ्या प्रमाणात शक्य झालेले नाही. भारतासारख्या 130 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशामध्ये लसीकरण कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कोरोना बाधित रुग्णांना किमान त्यांचे प्राण गमवावे लागू नये यासाठी विविध मार्ग अवलंनबले जात असून त्या पार्श्वभूमीवर  रॉश इंडियाच्या कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनला काही दिवसांपूर्वी आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली होती.

आता भारतातील माध्यम आणि सामान्य तीव्रतेच्या कोरोनाबाधित रुग्णांना अमेरिकेच्या ‘एलि लिली अँड कंपनी’ या औषध निर्माण कंपनीच्या कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोरोनाच्या लढ्यासाठी आणखी एक अस्त्र आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. या संदर्भात रॉयटर्सने माहिती दिली आहे. कोरोनावर औषध म्हणून नाही परंतु शरीरात अँटिबॉडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू किंवा वेगवान करण्यासाठी या इंजेक्शनचा उपयोग होणार आहे.

दरम्यान, लिली कंपनीकडून जाहीर करण्यात आल्याप्रमाणे कोरोनाचा सामना करण्यासाठी अधिकाधिक रुग्णांना उपचार मिळावेत, यासाठी हे इंजेक्शन मोफत पुरवता येतील का, याची चाचपणी सुरू आहे. त्यासंदर्भात केंद्र सरकारसोबत कंपनीकडून बोलणी सुरू असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

ही दोन्ही अँटिबॉडी असलेली इंजेक्शन्स रॉश इंडिया या औषध निर्मिती कंपनीने बनवली आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कोरोना उपचारांसाठी गेल्या वर्षी ही पद्धत वापरण्यात आली होती. कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, दोन्ही इंजेक्शनच्या कॉकटेल पॅकिंगमध्ये कासिरिविमॅब (Casirivimab) आणि इमडेविमॅब (Imdevimab) यांचे प्रत्येकी ६०० मिलीग्रॅमचे डोस आहेत. या प्रत्येक डोसची किंमत ५९ हजार ७५० रुपये एवढी आहे. या एका कॉकटेल पॅकिंगमधून दोन रुग्णांना डोस देता येऊ शकतील. एका कॉकटेल पॅकिंगची कमाल किंमत १ लाख १९ हजार ५०० एवढी आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *