कोरोना लस उपलब्धीबाबत काय म्हणतात ‘एम्स’चे संचालक आणि जागतिक तज्ञ?

आरोग्य
Spread the love

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)–देश आणि जगात कोरोना विषाणूचा संसर्ग अजूनही वाढत आहे. कोरोंना  संकटाने ग्रासलेले संपूर्ण जग केवळ एका गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि ती म्हणजे कोरोनाची प्रभावी आणि सुरक्षित लस कधी येणार.  रशिया आणि चीनने लस बनवल्याचा दावा केला आहे, तर भारत, अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देश ही लस बनवण्याच्या अगदी जवळ आले आहेत. दरम्यान, दिल्लीस्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, (एम्स)चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी या लसीबाबत दिलासा दिला आहे. कोरोना लस भारतीय बाजारात कधी उपलब्ध होईल हे त्यांनी सांगितले आहे. याबरोबरच  त्यांनी लसीकरणाबाबत चिंताही  व्यक्त केली आहे.

एका टीव्ही चॅनेलच्या कार्यक्रमात एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया म्हणाले की लसीवर चांगली प्रगती आहे. जर सर्व गोष्टी जुळून आल्या  तर 2021 च्या सुरुवातीला कोरोना लसीचे  औषध भारतीय बाजारात उपलब्ध होऊ शकेल.  ते असेही म्हणाले की लस बाजारात येईलच परंतु  सुरुवातीच्या टप्प्यात त्याची उपलब्धता देशाच्या लोकसंख्येनुसार पुरेशी ठरणार नाही.

ते पुढे म्हणाले की,कोरोना व्हायरस औषध कधी येईल याची हमी देणे थोडे अवघड आहे. कोरोना लसची प्रगती बर्‍याच बाबींवर अवलंबून असते. आपण प्रत्येक टप्प्यावर  यशस्वी होत गेलो  आणि सर्व गोष्टी  व्यवस्थित घडत राहिल्यास कोरोना लस औषध लवकरच देशात उपलब्ध होईल.

डॉ. गुलेरिया म्हणाले की, एकदा ही लस तयार झाली की ती कशी बाजारात आणता येईल हीदेखील मोठी समस्या असणार आहे. कारण लसीचे  वितरण प्राधान्याने होईल असे बर्‍याच संस्थांनी म्हटले आहे. सर्व प्रथम, ज्यांना सर्वात जास्त संसर्गाचा धोका आहे त्यांना ही लस दिली जाईल. वृत्तानुसार, रशियाने राजधानी मॉस्कोमध्ये सामान्य लोकांसाठी लसीची  पहिली तुकडी उपलब्ध करुन दिली आहे.

जगातील तज्ञ काय म्हणतात

दरम्यान,करोना विषाणूची लस विकसित करण्यात गुंतलेल्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोविड-19 साठी प्रभावी लस २०२१ मध्ये शरद ऋतुपूर्वी लोकांना उपलब्ध होण्याची शक्यता नाही. कॅनडामधील मॅकगिल विद्यापीठातील संशोधकांनी लस तयार करणाऱ्या 28 तज्ज्ञांसह सर्वेक्षण केले . यात सहभागी झालेले बहुतेक तज्ञ कॅनेडियन किंवा अमेरिकन वैज्ञानिक आहेत. हे सर्व तज्ञ तब्बल 25 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत.

मॅकगिल विद्यापीठाचे प्रा जोनाथन किमेलमन म्हणाले की आमच्या सर्वेक्षणात लस उपलब्ध होण्याबाबत  तज्ञांनी केलेले अंदाज अमेरिकन सरकारी अधिकाऱ्यांनी  दिलेल्या कालमर्यादेपेक्षा  (2021 च्या सुरूवातीस) कमी आशावादी आहेत. ते म्हणाले, की वैज्ञानिकांना असे म्हणणे आहे की पुढच्या वर्षी ग्रीष्म ऋतुमध्ये आम जनतेसाठी लस विकसित होणे ही अतिशय योग्य असेल. परंतु, संपूर्ण लोकसंख्येला ही उपलब्ध होण्यासाठी 2022 पर्यंतचा वेळ लागू शकतो असे त्यांनी म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *