पुणे–ऑनलाइन सेक्सट्रॉर्शन करून खंडणी मागीतल्यामुळे पुण्यातील दोघांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर त्याचे धागेदोरे राजस्थानपर्यंत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मुख्य सुत्रधाराच्या राजस्थानमध्ये जाऊन मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, या आरोपीला अटक करत असताना स्थानिक ग्रामस्थांनी पोलिस पथकावर हल्ला केला. विशेष धक्कादायक बाब म्हणजे गुरुगोठडी या गावातील स्त्री-पुरुष मिळून जवळपास २५०० लोक सेक्स्टॉर्शन रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे अटक केलेल्या तरुणाने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले आहे.
अन्वर सुबान खान (वय २९, रा. गुरूगोठडी ता. लक्ष्मनगढ जि. अलवर राज्य-राजस्थान ) याला दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या सायबर गुन्हे तपास पथकाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान या आरोपीला अटक करत असताना स्थानिक ग्रामस्थांनी पोलिस पथकावर हल्ला केला. ही संधी साधून आरोपी हा फरार झाला. यावेळी पोलिसांनी आरोपीचा अडीच कि.मी पाठलाग करून, जीवाची पर्व न करता त्याला अटक केली आहे. आरोपीला पाच मोबाईलसह ताब्यात घेतले आहे.
पुणे शहरात मागच्या महिन्यात सेक्सटॉर्शनच्या त्रासाला कंटाळून २ युवकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. वर्षभरात पुणे सायबर पोलीस स्टेशन येथे सेक्सटॉर्शनचे तब्बल १४०० अर्ज आले आहे. तर सेक्सटॉर्शन बाबत एक गुन्हा दाखल आहे. पुण्यात जे दत्तवाडी भागात राहणाऱ्या १९ वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाने आत्महत्या केली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी यातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. ज्या मोबाईल नंबरवरुन या मुलांना खंडणी मागितली जात होती, त्या नंबर्सचं लोकेशन पुणे पोलिसांनी शोधलं. ते लोकेशन राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड तालुक्यातील गुरुगोठडी गावातील निघाले.
दत्तवाडी पोलिसांकडून ५ लोकांचं एक पथक हे गुरुगोठडी ता.लक्ष्मनगढ जि. अलवर राज्य राजस्थान येथे पाठविण्यात आले होते. पोलिस वेशांतर करून त्या गावात गेले आणि आरोपीची माहिती घेतली. डोक्यावर पगडी, गमछा असा तेथील पोशाख परिधान केला आणि गुरुगोठडी या गावात ते गेले.आणि आरोपीला अटक केली. आरोपीला त्याच्या घराकडून घेवून जात असतांना आरोपीच्या नातेवाईकांनी व गावातील लोकांनी पोलिसांना विरोध केला. पोलिसांवर दगडफेक करुन आरोपीस पळवून लावले असता. त्या आरोपीचा २ ते ३ किमी पाठलाग करून, जीवाची पर्व न करता दत्तवाडी पोलीस स्टेशन सायबर गुन्हे तपास पथकाने ५ मोबाईलसह आरोपीस ताब्यात घेतल आहे.
अशी केली जाते फसवणूक
सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार केली जातात. त्यानंतर मुलगी बोलतेय असं सांगून तरुणांना जाळ्यात ओढलं जातं. त्यानंतर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांचे काही फोटो, व्हिडिओ शेअर करायला सांगितले जातात. त्यानंतर हे फोटोज मॉर्फ करुन, अर्थनग्न करुन त्यांना पाठवले जातात. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते. त्यांची फसवणूक केली जाते.