खळबळजनक :अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- गेल्या काही दिवसापासून पुण्यामध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे अनेक प्रकार घडत आहेत.  आज पुन्हा एकदा अशाच प्रकारची अत्यंत घृणास्पद घटना पुण्यामध्ये उघडकीस आली आहे. एका बारा वर्षाच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे स्टेशन जवळील जनसेवा शौचालयात हा प्रकार घडला आहे.  नराधम आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत

संबंधित पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबियांसमवेत पुणे स्टेशन जवळील जनसेवा शौचालया जवळील आतमध्ये असलेल्या एका छोट्याशा जागेत राहते.  ही मुलगी काल (शुक्रवारी)दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास  महिलांच्या स्वच्छतागृहात गेलेली असताना ती अल्पवयीन असल्याचे पाहून या नराधमाने तिचा पाठलाग करत तिच्यावर अत्याचार केले.  त्याच दरम्यान पीडित मुलीचा काका तिथे आला असताना त्याने दरवाजा वाजवला.  त्याचक्षणी आरोपीने दरवाजा उघडत काकाला बाजूला ढकलून दिले आणि तो पसार झाला.  मुलीने काकाला घडलेली सर्व घटना सांगितली. या आरोपीचे वय अंदाजे 35 वर्षाच्या असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पुण्यामध्ये अलीकडे अशा पद्धतीच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे सर्व थरातून संताप व्यक्त केला जात आहे.  काही दिवसांपूर्वी पुण्यातील येरवडा भागत अशाच प्रकारची घटना घडली होती.  एक तर्फी प्रेमातून दहावीतील मुलीवर शाळेमध्ये शिरून तिच्यावर हल्ला करण्यात आला होत तर एका प्रतिष्ठित संस्थेच्या शाळेत एक अनोळखी व्यक्तीने शाळेमध्ये शिरून अकरा वर्षाच्या मुलीवर शाळेच्या स्वच्छतागृहात बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता तसेच तिला धमकी दिली होती.  असे प्रकार वारंवार घडत असल्याने अशा नराधमांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *