जनसेवा पुरस्कार पूर्णम इको व्हिजन फाऊंडेशन आणि वनप्रस्थ फाऊंडेशनला जाहीर


पुणे- जनसेवा सहकारी बँक लि.च्या ५० व्या वर्धापन दिन समारंभानिमित्ताने जनसेवा पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. सन २०२२ चा जनसेवा पुरस्कार पूर्णम इको व्हिजन फाऊंडेशन आणि वनप्रस्थ फाऊंडेशन संस्थांना जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार सोहळा गुरूवार, दि.२४ नोव्हेंबर २०२२ रोजी महात्मा ज्योतीराव फुले सांस्कृतिक भवन,वानवडी येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. रुपये १ लाख १ हजार आणि सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण,वस्त्रोद्योग,संसदीय कार्य मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच कार्यक्रमाचे अध्यक्ष संघचालक,रा.स्व.संघ,प.महाराष्ट्र प्रांत नानासाहेब जाधव आणि प्रमुख वक्ते अखिल भारतीय प्रचार प्रमुख,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुनिलजी आंबेकर उपस्थित राहणार आहेत. जनसेवा सहकारी बँक लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम नाईक, अध्यक्ष डॉ.राजेंद्र हिरेमठ,उपाध्यक्ष रवि तुपे, संचालक राजेंद्र वालेकर, संचालक राजन वडके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

अधिक वाचा  रस्त्याच्या कामानिमित्त खोदलेल्या खड्ड्यांमध्ये दुचाकीवरून खाली पडून दोन तरुणांचा मृत्यू

यावर्षी जनसेवा बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जनसेवा पुरस्कार २०२२ – पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या पूर्णम इको व्हिजन फाऊंडेशन, पुणे  आणि वनप्रस्थ फाऊंडेशन, सिन्नर यांना प्रदान केला जाणार आहे. तसेच जनसेवा बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या औचित्याने बँकेचे संस्थापक सदस्य .वसंतराव देवधर यांना जनसेवा जीवनगौरव पुरस्कार तसेच बँकेचे संस्थापक संचालक सदस्य रघुनाथ तथा नाना कचरे आणि मधुकर तथा अण्णा टेमगिरे यांना जनसेवा कृतज्ञता सन्मान हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. बँकेच्या ५० वर्षांच्या ऐतिहासिक वाटचालीचा आढावा घेणारे जनसामान्यांची असामान्य बँक हे पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. 

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love