पुणे–महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगे सुरु राहिल्यास त्याच्या समोर जोरदार आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे वक्तव्य केले. मात्र, यावरुन पुण्यात मनसे मध्ये दुफळी निर्माण झाल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. राज ठाकरे यांनी मुसलमानांच्या भावना दुखावल्याने पुण्यात याधीच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर दुसरीकडे पुण्यात मनसेने पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चार दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. चार दिवसात भोंगे न काढल्यास पुण्यात दुप्पट भोंगे लवून हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, पुण्यात काही मुसलमानांनी राज ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या कब्रस्तानावर असलेले राज ठाकरे यांच्या नावाना काळा रंग लावला.Raj Thackeray’s name was blackened राज ठाकरे यांच्या निर्णयाचा निषेध त्यांनी नोंदवला आहे.
राज ठाकरे raj thakaray यांनी भाषणात भोंग्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाराज झालेल्या मनसेच्या मुस्लीम शाखाप्रमुखांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यानंतर वसंत मोरे vasant more यांनी या नाराज कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्या व्हायर मी पक्षाची नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका मांडली आहे. मी पक्षाच्या स्थापनेपासून मनसेत आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्यांनी मला सांगू नये, असे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे म्हणाले. राज ठाकरे) यांच्याशी माझे बोलणे झालेले नाही. त्यांनी बोलावले तर मी माझी भूमिका त्यांना समजावून सांगेल. कारण मला माझा प्रभाग नाही तर शहर शांत ठेवायचे आहे, असेही ते म्हणाले. टीका करणाऱ्यांनाही त्यांनी सुनावले आहे. ते म्हणाले, एवढेच होते, तर राज ठाकरे यांच्या भाषणानंतर किती जणांनी शहरात स्पिकर लावले? जे बोलतायेत त्यांनी आत्मपरीक्षण करावे, वसंत मोरेला पक्ष भूमिकेबद्दल शिकवू नये, असे वसंत मोरे म्हणाले आहेत. प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस hemant sambhus यांनी भोंग्यावर मत मांडताना वसंत मोरेंची भूमिका पक्षाची भूमिका नाही, असे म्हटले होते.
मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी मनसेचे पोलिसांना पत्र
मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस व पुणे शहर अध्यक्ष (रस्ते-साधन,सुविधा, आस्थापन विभाग)अश्विन चोरगे यांनी पोलीसांना दिलेल्या पत्रात सांगितले आहे की, सर्वाच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या नियमानुसार सर्व मशिदीवरील भोंगे अनाधिकृत ठरवले गेले आहे. आमच्या पक्षाची कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याची इच्छा नाही अथवा प्रार्थनेला विरोध नाही. परंतु अनाधिकृत भोंग्यामुळे सर्वसामान्य नागरिक,वृध्द व विद्यार्थी यांना होणारा त्रास मनसे खपवून घेणार नाही. अनाधिकृत भोंगे बंद करण्याची जबाबदारी पोलीस व सरकारवर आहे. येत्या चार दिवसात सर्व मशीदी समोर दुप्पट पटीने स्पिकर लावून हनुमान चालिसाचे पठन केले जाईल., त्यामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक तेढास सर्वस्वी सरकार जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे.
पुणे मनसे शहराध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भोंग्या बाबतच्या भूमिकेला विरोध करत मुस्लीमबहुल भागाचे प्रतिनिधीत्व आम्ही करत असल्याने प्रभागात शांतता कशी राहिल याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मी माझ्या प्रभागात तरी मशिदींसमोर भोंगे लावणार नाही. मी पक्षाच्या भूमिकेवर नाराज नाही, मी ज्या भागाचे १५ वर्ष प्रतिनिधीत्व करतो त्याठिकाणी मुस्लिम मतदार मोठया प्रमाणात आहे. शहरातील दोन पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते त्यांच्याशी चर्चा करुन त्यांची समजूत काढण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले आहे
बहीण म्हणून वसंत मोर यांच्या पाठीशी – रुपाली पाटील
मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माझ्या प्रभागातल्या मंदिरात मी भोंगे वाजवणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यावर बहीण म्हणून मी वसंत मोरेंच्या पाठीशी आहे. त्यांनी जी भूमिका घेतली, ती योग्यच आहे. कारण ते लोकप्रतिनिधी आहेत, अशी पाठराखण राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील rupali patil यांनी केली आहे. यानिमित्ताने त्यांनी वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याचे अप्रत्यक्ष निमंत्रणच दिले आहे..
रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, राज ठाकरेंची सभा ही भाजपाची होती. राज ठाकरेंनी यू-टर्न घेतला आहे. असे होईल हे कोणालाही वाटले नव्हते. राज ठाकरे म्हणाले, की शरद पवारांमुळे जातीवाद वाढला. तर मग हसन मुश्नीफ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे मंत्री असते का, असा सवाल त्यांनी राज ठाकरेंना केला आहे. राज ठाकरेंना भाजपाने बोलायला लावले. भाजपाने हे घडवून आणले आहे, अशी टीका रुपाली पाटील यांनी केली आहे.
राज ठाकरेंच्या नावाला काळे फासले
पुण्यातील कोंढवा भागातील नुरानी कब्रस्थानचे भूमिपूजन राज ठाकरे यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी झाले होते. राज ठाकरे यांच्या नावाला काळा रंग लावून स्थानिक लोकांनी त्यांचा निषेध दर्शवला आहे. Raj Thackeray’s name was blackened मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून मुसलमानांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे.