स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश


पुणे- पुण्यातील बाणेर येथील आलिशान सोसायटीत थाई स्पाच्या thai spa नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु होता. त्याचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. Exposed prostitution under the name of spa बाणेर येथील डिव्हाईन स्पावर Devine spa कारवाई करुन पोलिसांनी मालकासह तिघांना अटक केली आहे.

स्पाचा मालक दीपक कृष्णा पाटील (२६, रा. डिव्हाईन स्पा, साई हेरिटेज, बाणेर), पंचमाया लेपचा (रा. रिच लाईन, लिंक रोड, पाषाण), स्पाचा मॅनेजर सचिन प्रकाश शिंदे (२४, रा. ड्रायव्हर कॉलनी, काळेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच प्रविण धोंडीराम दुरगुडे (२५, रा. दिघी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाणेर येथील आलिशान साई हेरिटेज सोसायटीतील पहिल्या मजल्यावर डिव्हाईन स्पा हे थाई मसाज सेंटर चालविण्यात येत होते. येथे मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एक बनावट ग्राहक तेथे पाठविले. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी डिव्हाईन स्पावर छापा टाकला. तेथे वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या तीन तरुणींची सुटका करुन स्पा मालक व मॅनेजर अशा तिघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक तपास करीत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  #Girish Gautam | कायदा बदलून काही होणार नाही, मानसिकता बदलण्याची गरज आहे - गिरीश गौतम