भाजपने केला ‘काँग्रेस फाइल्स’ एपिसोड रिलीज : काँग्रेसच्या राजवटीत 48,20,69,00,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप


नवी दिल्ली -काँग्रेसने उद्योगपती गौतम अदानी (gautam adani) मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल करत ‘हम अदानी के है कौन’ या मोहिमेअंतर्गत अनेक प्रश्न उपस्थित केले असतानाच भाजपने ‘काँग्रेस फाइल्स’ एपिसोड केला आहे. या एपिसोडचा पहिला भाग रिलीज केला असून, काँग्रेसच्या राजवटीत 48,20,69,00,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यामध्ये केला आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरवर ‘काँग्रेस फाइल्स’चा पहिला भाग रिलीज केला आहे. काँग्रेसच्या राजवटीत एकापाठोपाठ एक भ्रष्टाचार आणि घोटाळे कसे झाले ते पहा, अशी सुरुवात करत कॉँग्रेसच्या शेवटच्या (2004-14) या दहा वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांचा दाखला दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कॉँग्रेस- भाजप वॉर रंगणार आहे.

यापूर्वी कॉँग्रेसने ‘हम अदानी के है कौन’  ही मोहीम राबविली होती. भाजपने विविध प्रकल्पांमध्ये अदानी समूहाला ‘मक्तेदारी’ दिल्याचा आरोप कॉँग्रेसने केला आहे.आता भाजपने त्याला शह देण्यासाठी भाजपने ‘काँग्रेस फाइल्स’चा पहिला एपिसोड रिलीज केला, काँग्रेसच्या राजवटीत 48,20,69,00,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यामध्ये केला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून काँग्रेस पक्षावर नव्याने हल्ला चढवत भारतीय जनता पक्षाने रविवारी ‘काँग्रेस फाइल्स’चा पहिला भाग प्रसिद्ध केला.

अधिक वाचा  स्मरण पं. दीनदयाळांचे

“काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार’ या व्हिडिओ मेसेजमध्ये भाजपने म्हटले आहे की, “काँग्रेसने आपल्या 70 वर्षांच्या राजवटीत जनतेकडून 48,20,69,00,00,000 रुपये लुटले आहेत. तो पैसा इतक्या ‘सुरक्षा,विकास आणि  उपयुक्त क्षेत्रांसाठी वापरता आला असता.

कॉँग्रेसने केलेल्या या भ्रष्टाचाराच्या रकमेतून 24 INS विक्रांत, 300 राफेल जेट आणि 1000 मंगल मिशन बनवता आले असते किंवा विकत घेता आले असते. पण काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची किंमत देशाला सोसावी लागली आणि देश प्रगतीच्या शर्यतीत मागे पडला.” असे या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.

भाजपने काँग्रेस पक्षावर आणखी हल्ला केला आहे. सन 2004 ते 2014 या कॉँग्रेस नेतृत्वाच्या खालील कार्यकाळ म्हणजे “हरवलेले दशक” असे संबोधण्यात आले आहे.

भाजपने व्हिडिओमध्ये पुढे म्हटले आहे की, “संपूर्ण 70 वर्षे बाजूला ठेवून, 2004-14 च्या शेवटच्या कार्यकाळाकडे पाहिले तर ते ‘हरवलेले दशक’ होते. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार होते, ज्यांनी याकडे डोळेझाक केली होती. त्यांच्या राजवटीत सर्व भ्रष्टाचार होत राहिला. त्या काळात भ्रष्टाचाराच्या बातम्यांनी रकानेच्या रकाने भरले जायचे, ज्याच्यामुळे प्रत्येक भारतीयाची मान शरमेने खाली जात होती.

अधिक वाचा  ईडी, सीबीआय आणि स्वार्थाचा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो : कोणाला म्हणाले अमोल कोल्हे असं?

1.86 लाख कोटी रुपयांचा कोळसा घोटाळा, 1.76 लाख कोटी रुपयांचा 2जी स्पेक्ट्रम घोटाळा, 10 लाख कोटी रुपयांचा मनरेगा घोटाळा, 70 हजार कोटी रुपयांचा कॉमनवेल्थ घोटाळा, इटलीसोबत हेलिकॉप्टर व्यवहारात 362 कोटी रुपयांची लाच, रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना दिलेली 12 कोटींची लाच या सर्व प्रकरणांचे दाखले या व्हीडिओत दिले आहेत.

व्हिडिओ संदेशाच्या शेवटी भाजपने म्हटले आहे की, “हा फक्त काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा झांकी (ट्रेलर) आहे, चित्रपट अजूनही संपलेला नाही.”

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love