पुण्यातील इन्फ्रा.मार्केटचा पहिला केवळ महिलांचा आरएमसी प्लँट सुरू

अर्थ पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- बांधकाम साहित्यासाठी भारतातील सर्वात मोठे व्यासपीठ चालविणाऱ्या इन्फ्रा.मार्केटने पुण्यातील आपला पहिला केवळ महिलांच्या रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लँट सुरु होण्याची घोषणा केली आहे. सुमारे १० पेक्षा अधिक महिला कर्मचारी असलेली ही इन्फ्रा.मार्केटची पहिलीच टीम कारखान्याचे सुरूवातीपासून शेवटपर्यंतचे कामकाज, गुणवत्ता नियंत्रण आणि विक्रीची जबाबदारी सांभाळेल. हे उत्पादन केंद्र हे पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांद्वारे चालविणाऱ्या भारतातील मोजक्या कारखान्यांपैकी एक आहे. 

हा कारखाना मुंढव्यात असून तो शहराचे केंद्र तसेच पुण्याच्या वाढत्या भागांच्या जवळ आहे. आपल्या स्थापनेपासूनच अधिक समावेशी कर्मचारी वर्ग निर्माण करण्याच्या आणि सर्व आघाडीवरील जागांवर महिलांना आर्थिक संधी पुरविण्याच्या प्रयत्नांतर्गत इन्फ्रा.मार्केटमध्ये उत्पादनाच्या भूमिकांमध्ये महिलांचा वाढता सहभाग दिसून आला आहे.  कंपनीने प्रशिक्षण, स्वयंचलन, भूमिकांमध्ये वाढीव कौशल्य देणे यावर लक्षणीय प्रमाणात गुंतवणूक केली असून वैविध्य वाढविण्यावर समर्पित भर दिला आहे.  इन्फ्रा.मार्केटने भारतातील कारखान्यांमध्ये ८० पेक्षा जास्त महिला कर्मचाऱ्यांची भरती केली आहे.

हा नवा टप्पा गाठल्याबद्दल भाष्य करताना इन्फ्रा.मार्केटच्या मुख्य एचआरओ शीतल भानोत म्हणाल्या, “महिला आता प्रत्येक विभागात, संघटनेच्या प्रत्येक पातळीवर महत्त्वाच्या भूमिका पार पाडत आहेत. त्या वैविध्यपूर्ण पार्श्वभूमीतून आलेल्या प्रतिभांना प्रोत्साहन देऊन अविश्वसनीय मूल्य आणि दृष्टिकोन उपलब्ध करून देत आहेत. त्या अगदी पारंपरिकरीत्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रांतही मर्यादा ओलांडून अधिक वैविध्यपूर्ण भूमिका स्वीकारत आहेत.”

त्या पुढे म्हणाल्या, ”एक समावेशी कार्यसंस्कृतीची जोपासना करून या क्षेत्राला महिलांच्या प्रतिभांना वाव देण्याकडे नेणे हा इन्फ्रा.मार्केटचा प्रयत्न आहे. आमचे सततचे प्रशिक्षण सत्र, कौशल्य वर्धन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्यामुळे त्या आपल्या ठसा उमटविण्यास सक्षम व्हाव्यात, हे आम्ही सुनिश्चित करत आहोत. त्याच वेळेस त्या आमच्यासोबत एक परिपूर्ण करिअरसाठी ही मोठी वाटचाल करत आहेत

इन्फ्रा.मार्केट हे अपेक्षित वर्तणूक आणि कामगिरी साध्य करण्यासाठी विशेष डिझाईन केलेले काँक्रीट पुरवतात.  क्यूसीआयचे प्रमाणपत्र मिळालेल्या कारखान्यात उत्पादन होऊन या उत्पादन प्रक्रियेचे सुरूवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थापन व्हावे, यासाठी कंपनीने सर्वोच्च दर्जाच्या गुणवत्ता प्रणाली राबविल्या आहेत. डिस्पॅच आणि ट्रॅकिंग यांमध्ये इन्फ्रा.मार्केटच्या अनुभवामुळे कमाल ऑर्डर बुकिंगची हमी मिळते आणि डिलिव्हरीच्या वेळेस व्हिजिबिलिटी मिळते – वेळेवर आणि प्रत्येक वेळी! संपूर्ण काँक्रीट व्हॅल्यू चेनचे एक खिडकी माध्यमातून डिजिटायझेशन करण्यात आले आहे जेणेकरून ग्राहकांना सामील करून घेऊन तयार उत्पादनाच्या डिलिव्हरीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया सुलभ होईल. रिअल टाईम रिपोर्टींग आणि सर्वसमावेशक डॅशबोर्ड्स यांद्वारे ग्राहकांचा अनुभव समृद्ध करण्यात येतो. त्यामुळे संपूर्ण पुरवठा साखळीला दृश्यमानता मिळते

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *