टीटीबीएस स्मार्टफ्लो क्लाऊड कम्युनिकेशन सूट मार्फत व्हाट्सअप बिझनेस प्लॅटफॉर्म उपलब्ध करवून देणार


पुणे- व्यवसाय, उद्योगांना कनेक्टिव्हिटी व कम्युनिकेशन सुविधा पुरवणारी देशातील एक आघाडीची कंपनी टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेसने व्हाट्सअप बिझनेस प्लॅटफॉर्मसोबत आपला क्लाऊड कम्युनिकेशन सूट स्मार्टफ्लोचा धोरणात्मक विस्तार करत असल्याची घोषणा केली आहे. बिझनेस कम्युनिकेशनचा प्रगत अनुभव प्रदान करण्यासाठी कंपनीने हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले असून त्याद्वारे युजर्सना जोडून घेण्याच्या प्रक्रियेला वेग येईल, ग्राहकांना मिळणाऱ्या अनुभवात वाढ होईल व ग्राहकांसोबत प्रभावी संवाद घडून येईल असा दावा कंपनीने केला आहे.

जगभरातील ग्राहकांसोबत चर्चा आणि त्यांच्या प्रश्न व शंकांचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने करता यावे यासाठी व्हाट्सअप बिझनेस प्लॅटफॉर्म ही एक सहजसोपी व विश्वसनीय सुविधा आहे. त्याच्या उत्कृष्ट युएक्समुळे बिझनेस कम्युनिकेशन अधिक वाढते, आजच्या व्यावसायिक इकोसिस्टिममध्ये ग्राहकांना ज्याप्रकारे जोडून घ्यायला आवडते त्यामध्ये अखंडित व प्रभावी संवाद यामुळे घडून येऊ शकतो.

तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल अनुभवांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस आपल्या व्यावसायिक ग्राहकांच्या गरजा व आवश्यकता याविषयी सखोल ज्ञान तसेच ग्राहकांचा विश्वास व सेवेविषयी खात्री यांच्या बळावर पुढे जात आहे. या एकीकरणामुळे व्यवसायांना ग्राहकांच्या संचालनात्मक गरजांचे विविध चॅनेल्समध्ये मॅपिंग करण्यात मदत मिळेल, युनिफाईड हायपर-पर्सनलाइज्ड (संपूर्णतः वैयक्तिक) संवाद आणि मल्टी-टच ऍट्रिब्युशन्स यांच्याद्वारे ग्राहकांना मिळणाऱ्या अनुभवात वाढ होणार आहे.

अधिक वाचा  सावरकरांना "स्वातंत्र्यवीर" का म्हणावे ?

टाटा टेली सर्व्हिसेस लिमिटेडचे एसव्हीपी व हेड प्रॉडक्ट, मार्केटिंग व कमर्शियल विशाल रॅली यांनी सांगितले, आमच्या स्मार्टफ्लो बिझनेस सूटमार्फत व्हाट्सअप बिझनेस प्लॅटफॉर्म सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. यामुळे व्यवसायांना नव्या आव्हानांशी जुळवून घेता येईल, आपल्या ग्राहकांना मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अतुलनीय सहायता प्रदान करता येईल. आजच्या ग्राहकांची अपेक्षा आहे की संवाद हा कार्यक्षम, सहजसोपा असला पाहिजे, जे व्हाट्सअप बिझनेस प्लॅटफॉर्ममुळे शक्य होते. टीटीबीएसमध्ये आम्ही व्हाट्सअप बिझनेस सुविधा पुरवठादार म्हणून आमच्या मौल्यवान ग्राहकांना आम्ही विश्वसनीय आणि सर्वोत्कृष्ट युजर अनुभवाची हमी देतो.

व्हाट्सअप इंडियाचे डायरेक्टर, बिझनेस मेसेजिंग रवी गर्ग यांनी सांगितले,  विविध प्रकारच्या ग्राहक सुविधा उभारण्यासाठी सर्व क्षेत्रातील व्यवसाय व्हाट्सअप बिझनेस प्लॅटफॉर्मचा वापर करतात. यामुळे ग्राहकांच्या सुविधेमध्ये वाढ करण्यात मदत मिळते आणि ग्राहकांसोबतचे संबंध अधिक दृढ होतात. दररोज मोठ्या प्रमाणावर व्हाट्सअपचा वापर करणाऱ्या नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी नव्या संधींचा वापर करून घेण्यात व्यवसायांची मदत करण्यासाठी आम्ही भागीदारी उभारत राहू.

अधिक वाचा  सिंहगडावर ई-बसला अपघात : मोठा अनर्थ टळला : आठवडाभरात तिसरी घटना

स्मार्टफ्लो आणि व्हाट्सअप बिझनेस प्लॅटफॉर्म मिळून एकीकृत ओम्नीचॅनेल (विविध चॅनेल्समध्ये मिळवता येईल असा) सुविधा अनुभव पुरवतात ज्यामध्ये ग्राहकांसोबत जोडले जाण्यासाठी आणि त्यांच्यासोबत एकीकृत होण्यासाठी वेगवेगळी चॅनेल्स व पद्धतींचा समावेश आहे. वेबसाईट्स, मोबाईल ऍप्स, सोशल मीडिया आणि फोन कॉल्स अशा विविध चॅनेल्सवर ग्राहकांना मिळणारा अनुभव यामध्ये एकत्र करण्यात आला आहे. संवाद अनुभवात जास्तीत जास्त वाढ करू शकेल अशी ही एकल-बिंदू व्यवस्था आहे.

स्मार्टफ्लोमध्ये अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे बिझनेस कम्युनिकेशन सहजसोपे आणि प्रभावी बनते – सिंगल कस्टमर व्ह्यू, वर्कफ्लो ऑटोमेशन, एआय-एनेबल्ड चॅटबोट, चॅट इंटरफेस, ऍडव्हान्स्ड ऍनालिटिक्स, हायपर-पर्सनलायझेशन, वन-क्लिक इंटिग्रेशन आणि सहजपणे एकीकृत करता येईल अशा एपीआय प्लॅटफॉर्म.

स्मार्ट डिजिटल सुविधा पुरवणाऱ्या देशातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस आपल्या ग्राहकांना असे डिजिटल महामार्ग पुरवते, ज्यावर सर्व छोट्या-मोठ्या कंपन्या आपले व्यवसाय सक्षमपणे दौडवू शकतात, इतकेच नव्हे तर, सुरक्षा, समन्वय, मार्केटिंग, क्लाऊड, सास या क्षेत्रांमध्ये डिजिटल सुविधांचा व्यापक पोर्टफोलिओ सादर करून ही कंपनी आपल्या ग्राहकांच्या वृद्धीला वेग प्रदान करते.

अधिक वाचा  शुभश्री दिवाळी अंक २०२२ : वाचा संपूर्ण अंक डिजिटल स्वरूपात

टाटा टेली सर्व्हिसेसकडे व्यावसायिक श्रेणीच्या स्मार्ट सुविधांचा एक परिपूर्ण पोर्टफोलिओ उपलब्ध आहे, यामध्ये स्मार्टफ्लो, स्मार्टऑफिस, एसडी-वॅन आयफ्लेक्स, मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५, गूगल वर्कप्लेस, झूम कम्युनिकेशन्स, ईझेड क्लाऊड कनेक्ट, अल्ट्रा-लोला आणि स्मार्ट इंटरनेट लिज्ड लाईन यांचा समावेश आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love