Ramdas Athawale claims eight to ten seats in the Legislative Assembly

डिसेंबर अखेर महानगरपालिकेच्या निवडणुका होतील : रामदास आठवले यांचे भाकीत

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे-आधीच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयाने अनेक अडचणी आल्या, पण आता शिंदे सरकार सगळ्या गोष्टी नीट करत आहेत. डिसेंबर अखेर महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. असे भाकीत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

राज्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुका या तीनचा प्रभाग रचना करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर सरकारने शिंदे व फडणवीस सरकारने चारचा प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला. त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिंदे व फडणवीस सरकार विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली दोन दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने पुण्याच्या चारचा प्रभाग रचन ला स्थगिती दिली. त्यावर बोलताना आठवले म्हणाले, आधीच्या ठाकरे सरकारनं प्रभाग बदलले आणि सगळा गोंधळ झाला त्यामूळे निवडणुका लांबणीवर पडल्या. आधीच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयाने अनेक अडचणी आल्या, पण आता शिंदे सरकार सगळ्या गोष्टी नीट करत आहेत. डिसेंबर अखेर महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. रामदास आठवले हे आज दलित पँथच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

शिवसेना व भाजप यांची आधी युती होती. पण आता युती तुटल्यामुळे शिंदे शिवसेना गट व भाजप एकत्र आले आहेत. त्यावर रामदास आठवले म्हणाले, आधी शिवसेना ही भाजप सोबत आणि आरपीआय सोबत होती. पण मधल्या काळात ती दूर गेली. पण आता खरी शिवसेना आमच्या सोबतच आहे. आरपीआय आगामी काळात भाजप, एकनाथ शिंदे गट एकत्र राहील, असे रामदास आठवले म्हणाले.

सत्ताधाऱ्यांकडून रोज नव्या घोषणा दिल्या जात आहेत. त्यावर भाष्य करताना रामदास आठवले यांनी कवितेच्या चार ओळी ऐकवल्या. ‘ते म्हणतायत ५० खोके, एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के, आम्ही आहोत पक्के, अशा कवितेच्या चारओळीच, आठवले यांनी ऐकवल्या.

दरम्यान, विरोधक आमचं सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र तुम्ही काही केलं तरी आमचं सरकार पडणार नाही. निवडून येऊ आणि सरकार स्थापन करू. हे विरोधक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

दलितांवर राज्यात होणाऱ्या अत्याचार हे वाढले आहेत. यामुळे दलित समाज सुद्धा आक्रमक झाला आहे. त्यावर दलितांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आम्ही संघर्ष करणार, असे आश्वासनही यावेळी रामदास आठवले यांनी दिले.

ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल लोकांना आरक्षण मिळायला हवं ही मागे मागणी केली होती. याचा विचार आता पुन्हा नक्की करण्यात येईल. मराठा समाजाला जसं आरक्षण दिलं. तसंच ब्राह्मण समाजालाही आरक्षण दिलं पाहिजे ही मागणीमी सर्वात आधी केली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पक्ष बांधणीसाठी हे संमेलन होत. आणखीन पदे लवकरच निवडण्यात येणार आहेत. आज दलित पँथरचा स्थापना दिवस पुण्यात होणार आहे. संपूर्ण राज्यभर अम्ही अनेक कार्यक्रम राबवत आहोत. दलितांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आम्ही संघर्ष करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल लोकांना आरक्षण मिळायला हवं ही मागे मागणी केली होती. याचा विचार आता पुन्हा नक्की करण्यात येईल. मराठा समाजाला जसं आरक्षण दिलं. तसंच ब्राह्मण समाजालाही आरक्षण दिलं पाहिजे ही मागणीमी सर्वात आधी केला होती.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *