#PIFF: पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धेतील ७ मराठी चित्रपटांची घोषणा

Pune International Film Frstival
(Pune International Film Frstival

PIFF–पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) (Pune International Film Frstival) (PIFF) महोत्सव २०२४’ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट (International Marathi Film) स्पर्धेमधील ७ चित्रपटांची घोषणा आज महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल(Dr. Jabbar Patel) यांनी केली. (Announcement of 7 Marathi films in competition of Pune International Film Festival)

आज (२ जानेवारी २०२४) दुपारी २ वाजता महोत्सवाच्या www.piffindia.com या अधिकृत वेबसाईटवर या चित्रपटांची माहिती प्रदर्शित झाली आहे. 

या महोत्सवात मराठी चित्रपटांच्या स्पर्धेचे परीक्षण आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्यूरी करतात. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटास ५ लाख रुपयांचा महाराष्ट्र शासनाचा ‘संत तुकाराम’ पुरस्कार दिला जातो. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’, ‘सर्वोत्कृष्ट पटकथा’ आणि ‘सर्वोत्कृष्ट छायाचित्रकारा’स प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पुरस्कार दिले जातात.

अधिक वाचा  हवा प्रदूषण : एआरएआय संस्थेने तयार केली पुणे जिल्ह्यातील प्रदूषकांची 'उत्सर्जन यादी'

१८ ते २५ जानेवारी दरम्यान ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव २०२४’ होणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (६ स्क्रीन), कॅम्प परिसरातील आयनॉक्स (३ स्क्रीन) आणि औंध भागातील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलीस चित्रपट गृहात (२ स्क्रीन) या तीन ठिकाणी एकूण ११ स्क्रीनवर चित्रपट दाखविले जाणार आहेत.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सवात दरवर्षी निवडले जाणारे मराठी चित्रपट महाराष्ट्राच्या विविध भागातील युवकांनी तयार केलेले असतात आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होतात, असा अनेक वर्षांचा अनुभव असून, याही वर्षी ही परंपरा कायम राहील, असा विश्वास डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केला.

महोत्सवासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया शुक्रवारी २३ डिसेंबरपासून www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाली असून, चित्रपटगृहांवर स्पॉट रजिस्ट्रेशन प्रक्रिया ५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. रसिक प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण महोत्सवासाठी नोंदणी शुल्क रुपये ८०० फक्त आहे.

अधिक वाचा  श्रीनाथ भिमाले यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या मतदार नोंदणी व मुख्यमंत्री लाडकी बहीण अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्पर्धेतील मराठी चित्रपट

१ वल्ली – दिग्दर्शक: मनोज शिंदे

२. स्थळ – दिग्दर्शक: जयंत दिगंबर सोमलकर

३. भेरा –  दिग्दर्शक: श्रीकांत प्रभाकर

४. श्यामची आई –  दिग्दर्शक: सुजय सुनील डहाके

५. नाळ भाग २ – दिग्दर्शक: सुधाकर रेड्डी यक्कंटी

६. छबिला – दिग्दर्शक: अनिल अमृत भालेराव

७. जिप्सी – दिग्दर्शक: शशि चंद्रकांत खंदारे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love