A 16-year-old school boy was brutally beaten and his naked video went viral on social media.

#blackmagic: जादुटोणासारखे अघोरी कृत्य करून व्यावसायिकाला कोट्यावधींचा गंडा : मुख्य आरोपीसह पत्नीला अटक

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

blackmagic-जादुटोणासारखे (Black Magic) अघोरी कृत्य (Horrible Act) करून व्यावसायिकाला (Business Man) कोट्यावधींचा गंडा घालणार्‍या मुख्य आरोपीसह पत्नीला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी आतापर्यंत ६ कोटी २३ लाखांवर रूपयांची फसवणूक (Fraud) केल्याचे उघडकीस आले आहे. चार महिन्याच्या कालावधीत संबंधित आरोपींनी तिघांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. (The businessman was robbed of crores of rupees by doing a horrible act)

अब्दुल हुसेन हसनअली नईमआबादी ( Abdul Hussain Hassan Ali Naeem Abadi) आणि सीमा उर्फ रोहा अब्दुल हुसेन नईमआबादी (Seema alias Roha Abdul Hussain Naeemabadi) (दोघेही रा. कॅम्प) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

व्यावसायिकाची जादूटोणाच्या (Black Magic) नावाखाली आरोपींनी फसवणूक केली होती. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात ६ आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. दरम्यानच्या काळात संबंधित आरोपींवर कोंढवा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हितसंबधाचे संरक्षण अधिनियम प्रमाणे २ कोटी ७६ लाख रुपयांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले. तसेच मुक्तार हुसेन मोहमंद यांची १ कोटी ०६ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. चार महीन्यांमध्ये तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चार गुन्हे मिळून ६ कोटी २३ लाखांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी आरोपींचा माग समर्थ पोलिसांकडून काढण्यात येत होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर आणि पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून आरोपींचा शोध घेतला जात होता.

 आरोपी मागील चार महिने  घर बंद करून फरार झाले होते. आरोपींना शोधण्याचे पोलीसांना मोठे आव्हान होते. पोलीस उपनिरीक्षक सौरभ थोरवे आणि  अंमलदार हेमंत पेरणे यांनी तांत्रिक विश्लेषण केले.  गुन्हयातील मुख्य आरोपी अब्दुल आणि पत्नी सीमा उर्फ रोहा  कॅम्प परिसरात सोसायटीत लपून बसल्याची माहिती मिळाली.  पोलिसांनी इतर स्टापच्या  मदतीने दोन्ही आरोपींना सापळा रचून  ताब्यात घेतले.  आरोपींना समर्थ पोलीस ठाण्यात आणून अटक केली.ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक  सूरज वंडगर, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, उपनिरीक्षक सौरभ थोरवे, उपनिरीक्षक ज्योती कुटे,  हेमंत पेरणे, दत्तात्रय भोसले,  संतोष डमाळे,  निलम करपे,  गणेश वायकर, प्रमोद जगताप,  शरद घोरपडे, प्रफुल्ल साबळे,  सीमा गायकवाड, स्वाती भालेराव यांनी केली .

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *