पुणे– बिग बॉस फेम अभिजित बिचुकले पुण्यात झालेल्या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्या बरोबर त्यांचे चार मित्रही या अपघातात जखमी झाले असून या सर्वांवर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिचकुले यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
मूळचे सातार असलेले अभिजित बिचुकले पेढ्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात राहतात. पुण्यातील शुक्रवार पेठेत त्यांचं पेढ्याचं दुकान आहे. आज दुपारी शहरातच प्रवासादरम्यान त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्या गाडीत त्यांचे ४ मित्र प्रवास करत होते. चौघांनाही किरकोळ दुखापत झाली, प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांचीचा सल्ला दिला आहे.
अपघातानंतर आणि उपचारानंतर अभिजित बिचुकलेने आपल्या चाहत्यांना माझी तब्येत स्थिर असून काळजीचं कारण नसल्याचं सांगितलंय. डोक्याला मार किरकोळ लागला आहे . त्यातून लगोलग सावरेल, अशी प्रतिक्रिया दिली