…म्हणून लतादीदींचा स्वर जगावर अधिराज्य करतो – रामदास फुटाणे

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे -ज्याच्याकडे जे जे काही चांगलं आहे ते आपण घ्यावं ही प्रेरणा भालजी पेंढारकरांकडुन मिळाली.तसेच लता दीदींकडून १९७४ पासून मी खुप काही शिकलो आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजली त्यावेळी मला पु .लं.नी सांगितलेल्या आकाशात सूर्य चंद्र आहे आणि लता दीदींचा स्वर आहे याची जाणीव झाली. आकाशात सूर्य २४ तास नसतो तर चंद्र ३० दिवस नसतो मात्र लता दीदींचा स्वर २४ तास ३६५ दिवस आकाशात असतो. म्हणून त्यांचा स्वर जगावर अधिराज्य करतो, अशा भावना जेष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी  व्यक्त केल्या .

भारतरत्न स्वरसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्याच्या कर्यक्रमात ते बोलत होते.या प्रसंगी स्वरप्रतीभा दिवाळी अंक , संवाद आणि कोहिनूर ग्रुप यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात कॉँग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार ,जेष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ आणि प्रख्यात गायिका अनुराधा मराठे यांनी लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला .

प्रारंभी मंचावर स्व. लता दीदींच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून सर्वांनी एक मिनिट स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहिली. यानंतर ‘स्वरप्रतीभा’चे संपादक प्रवीण प्र वाळिंबे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले . ते म्हणाले की, महाराष्ट्रातील १५ जिल्हे आणि देशातील सुमारे २० राज्ये यांच्या मधील वृत्तपत्रांमध्ये स्व.लता दीदींवर प्रकाशित आग्रलेखांचा विशेषांक लवकरच स्वराप्रतीभा तर्फे प्रकाशित करणार असून, देशातील ७ फेब्रुवारीच्या वृत्तपत्रांचे व परदेशातील बातम्यांचे प्रदर्शनही त्यावेळी आयोजित करण्यात येईल.

संवाद चे सुनील महाजन यांनी म्हटले की आम्ही रसिक आणि कलाकार यांच्याशी संवाद करत असतो. असा दोन वेळा संवाद करण्याची संधी मला मिळाली.यांच्या बरोबर फोटो काढावयाची आणि हितगुज करण्याची संधी मिळाली हा माझ्या आयुष्यातील एक ठेवा आहे.

कोहिनूर ग्रुप चे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी म्हटले की,लता दिदींना रूग्ण सेवा पुरस्कार समितीच्या वेळी पहिल्यांदा भेटलो त्यावेळी त्यांच्यातील साधेपण मला भावले त्यानंतर आशा भोसलेंच्या म्हणजे लहान बहिणीच्या नावाचा पुरस्कार स्वीकारून दीदींनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवून दिला.

‘स्वरप्रतीभा’ दिवाळी अंकात प्रकाशित स्व. लता दीदींच्या लोकप्रिय १००० गाण्यांचे मुखडे, सहगायक, गीतकार ,संगीतकार ,चित्रपट व वर्ष यांची माहिती देणारा विशेषांक यावेळी श्री रामदास फुटाणे व सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.या अंकात लंडन येथील अल्बर्ट हॉल कार्यक्रमावरील मधु अभ्यंकर यांचा लेख आणि ‘गॉडमदर’ शिरीष कणेकर यांचा लेख व स्व लता दिदींनी १९९६ मध्ये झालेल्या ६९ वे अ भा मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून केलेलं उत्स्फुर्त भाषण या पूर्वप्रकाशित साहित्याचा समावेश आहे.   

स्व.लता दीदींच्या आठवणींना उजाळा देताना जेष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ म्हणाले की,गेली ४० वर्षे लता दीदी आणि मंगेशकर कुटुंबीयांशी ऋणानुबंध तयार झाले आहेत . सप्टे.२०२१ ला लतादिदिंशी फोनवरून एक तास संवाद झाला. भरभरून त्या बोलल्या. त्या अगोदर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी घेण्यासाठी दिदींना भेटलो .त्यावेळेस दिदिंनी ज्या मुळ चिजा मला ऐकवल्या तो माझ्या आयु्ष्यातला अविस्मरणीय ठेवा आहे.स्वर शब्द सिद्धी लय यांची एकरूपता म्हणजे दिदिंचे गाणे होय.लहानपणा पासून त्यांनी रंगमंचावर गायले. वडिलांचा अभिनय बघितला या संस्कारातुन तयार झालेल्या दिदिंच्या गाण्यात अभिनयही दिसतो. दिदींना ह्रदयनाथ मंगेशकरांच्या चाली आव्हानात्मक वाटायच्या. अनेक भाषांमधून दिदिंनी गाणी गायली कारण ,त्या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. कोणतही गाणं आल्यानंतर ते हस्ताक्षरात लिहणे त्यातील बारकावे समजून घेणे अनिल मोहिल्यांच्या कडून त्यातील सुरावट उतरवून घेणे असा भरजरी कागद घेऊन त्या गायला उभ्या राहिल्या की ,त्यांची तान गगनाला गवसणी घाले.

प्रख्यात गायिका अनुराधा मराठे यांनी स्व लता दीदींची  बडा नटखट हे रे,मालवून टाक दीप ही गाणी गुणगुणून म्हटले की,बडा नटखट हे गाणं ऐकताना शर्मिला टागोर यांचा चेहरा डोळ्या समोर येतो. हीच दीदीच्या गाण्याची खासियत आहे प्रत्येक अभिनेत्रीच्या बोलण्याची ढब लकब त्यतले बरकावे याचा अभ्यास त्या करायच्या लहानपणापासून त्यांची गाणी रेडिओ वर ऐकून मी लिहित असे.त्यात कोणतीही चूक होत नसे कारण, त्यांचे उच्चार स्पष्ट होते. त्यामुळेच लहानपणा पासून आज पर्यत माझ गाणे त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे .

या प्रसंगी जेष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार यांनी कलाकारांना अंक देऊन मनोगत व्यक्त केले व म्हटले की,आळंदी साहित्य संमेलनात मायबोली साठी मराठी माणसाने काय केले पाहिजे हे लता दिदिनी सांगितले त्यावेळी मला ते प्रत्यक्ष ऐकता आले.त्यांनी त्यावेळी असा आग्रह धरला की,आपल्या मुलांचा बुध्यांक आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्यांना स्वभाषेत शिक्षण द्या.

‘स्वराप्रतीभा’चे संपादक प्रवीण प्र. वाळिंबे यांनी आभारप्रदर्शन केले.

यानंतर पार्श्व गायिका स्नेहल आपटे व गीतांजली जेधे आणि हेमंत कुमार यांनी लता दीदींची अवीट गाणी गाऊन संगीतमय आदरांजली अर्पण केली .या प्रसंगी साउन्ड –रवि मेघावत ,दर्शना जोग व आनय गाडगीळ (कीबोर्ड)अपूर्व द्रविड (तबला ,ढोलक)रोहन वनगे (रिदम मशीन) यांनी वाद्यसंगत केली .

या प्रसंगी 1 आयेगा आनेवाला –  2  लग जा गले – 3 आजा सनम मधुर – 4 अखेरचा हा तुला दंडवत – 5 एक प्यार का नगमा है – 6 जीवनात ही घडी – 7 हसता हुआ नुरानी चेहरा – 8 बेदर्दी बालमा – 9 तुझसे नाराज नही – 10 तेरे मेरे मिलन की ये रैना 11 परदेसीया ये सच है – 12 तुझे देखा तो ये – 13 आते जाते हसते गाते – 14 आके ‘तेरी बाहो मे, ही स्व लता दिदींनी गायलेली लोकप्रिय गाणी सादर केली . सुनील धनगर यांनी कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास रसिकांची मोठी गर्दी होती.करोना नियमावलीचे कसोशीने पालन केले गेले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *