निर्माता व दिग्दर्शकांनी नफ्यातील काही वाटा पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासाठी ठेवावा- प्रवीण तरडे


पुणे–निर्माता व दिग्दर्शकांनी नफ्यातील काही वाटा पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासाठी ठेवावा, पडद्यावर चकाकणाऱ्या चेहऱ्यामागे हजारो हात असतात व कोरोना संकट असो किंवा इतर वेळी त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होत असल्याने त्यांच्या संकटकाळात हा निधी उपयुक्त ठरेल असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे यांनी केले.

क्रिएटिव्ह फाउंडेशन व मुकुलमाधव फाउंडेशन च्या वतीने 100 कलावंताना मदतीचा हात म्हणून किराणा माल देण्यात आला, यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने प्रसिद्ध गीतकार व शांताबाई ह्या गाण्यामुळे लोकप्रिय झालेले कलावंत संजय लोंढे यांना ही धनादेश व एक महिन्याचे रेशन अशी मदत देण्यात आली.श्री रविकिरण देसाई व ऋतुजा देसाई यांनी संजय लोंढे यांच्यासाठी 5000/रुपयांचा धनादेश दिला.यावेळी प्रसिद्ध अभिनेते रमेश परदेशी, शिक्षण समिती अध्यक्ष व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,मुकुलमाधव फाउंडेशनचे श्री. मोकळे, यास्मिन शेख, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे विश्वस्त प्रतीक खर्डेकर, कल्याणी खर्डेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  मैलापाणी शुद्धीकरणासाठी अमित राऊत यांच्या कल्पनेतून साकारलेल्या प्रकल्पाचे राज ठाकरेंकडून कौतुक

प्रवीण तरडे म्हणाले, माझे चित्रपट यशस्वी झाले त्यामागे बॅकस्टेज आर्टिस्टचा  मोठा हात असल्याने मी सामाजिक जाणीवेतून स्वामींच्या कृपेनें त्यांना मदत करू शकलो, मात्र संकटकाळासाठी कायमस्वरूपी मदत निधी उभा करणे काळाची गरज असल्याचे मतही तरडे यांनी व्यक्त केले.त्याच बरोबर राज्य सरकारने पडद्यामागील कलाकारांचा विचार करून अन्य राज्यांप्रमाणे मालिका व चित्रपटांच्या चित्रीकरणास परवानगी द्यावी अशी

आज संकट काळात कलाकाराला लोकांश्रय मिळत आहे पण राजाश्रय कधी मिळणार असा सवाल अभिनेते रमेश परदेशीं यांनी केला. प्रवीण तरडे यांनी लाकडाऊनच्या  काळात तब्ब्ल 14 लक्ष रुपये या बॅकस्टेज कलावंतांसाठी दिले हा कित्ता इतरांनी ही गिरवावा असेही मत रमेश परदेशीं यांनी व्यक्त केले.

क्रिएटिव्ह फाउंडेशन ने ठरविले की दान हे सतपात्री असावे, याच भावनेतून समाजात ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी संस्था मदतकार्य करत असून यापुढे ही हे कार्य अखंड सुरु राहील असे सांगतानाच संदीप खर्डेकर म्हणाले की कलाकार हा वर्षभर आपले मनोरंजन करत असतो त्याच्या मेकअप आड त्याचे दुःख लपवून तो फक्त प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आणि कौतुकाचा भुकेला असतो मात्र ह्या संकटकाळात नाटकं, चित्रपट व मालिकांना मोठा फटका बसला असून अनेक कलावंत जगण्यासाठी धडपडत आहेत, अश्या सर्वांच्या प्रतीचे कर्तव्य म्हणून क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन ने हे मदतकार्य आरंभीले असून जेथे कमी तेथे आम्ही हे आमचे ब्रीद असल्याचे ही खर्डेकर म्हणाले. मु

अधिक वाचा  नाटकांतून इतिहासाचा विपर्यास किंवा खलप्रवृत्तीचे उदात्तीकरण कदापि होता कामा नये- शरद पवार

कुलमाधव फाउंडेशन ने आत्तापर्यंत 80000 गरजूना शिधा वाटप केला असून यापुढे ही हे कार्य सुरु राहील असे  मोकळे म्हणाले.माझी सद्यस्थिती नाजूक असून (आर्थिक ) क्रिएटिव्ह फाउंडेशन व समाजाच्या विविध स्तरातून मदत होत आहे त्याबद्दल मी ऋणी असल्याचे मत संजय लोंढे यांनी व्यक्त केले.

संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक, मंजुश्री खर्डेकर यांनी आभारी प्रदर्शन तर योगेश सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love