छोट्या व्यावसायिकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रोत्साहन : विद्यापीठाच्या विद्युत आणि स्थापत्य विभागाची दुरुस्तीची कामे छोट्या व्यावसायिकांना;इथे भरा टेंडर


पुणे – कोरोनाच्या या काळात लहान व्यावसायिक व ठेकेदार यांना काम मिळावे दृष्टीकोनातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रेसिडेंशिअल आणि नॉन रेसिडेंशिअल असे दोन इमारतींचे प्रकार आहेत. यामध्ये असणारी विद्युत आणि स्थापत्य विभागाची कामे सुरू असतात. ही कामे आजवर विद्यापीठ नियमानुसार मोठ्या व अनुभवी ठेकेदारांना मिळत असत. मात्र कोरोना महामारीच्या काळात अनेक छोटे व्यावसायिक, ठेकेदारांच्या हातची कामे गेली. या काळात त्यांना मदतीची गरज असल्याने विद्यापीठाकडून या व्यवसायिकांसाठी टेंडर काढण्यात येत आहे. यातील नागरी विभागांतर्गत कामांचे टेंडर या आधीच काढले असून येत्या आठ दिवसांत विद्युत विभागाचेही काढण्यात येणार आहे.

अधिक वाचा  पुणे विद्यापीठाची प्रथम सत्र परीक्षा उद्यापासून(१० एप्रिल): ६५ टक्के विद्यार्थ्यांनी दिली सराव परीक्षा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या ‘इमारत काम समिती’ च्या बैठकीत या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी टेंडरच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहे.

याबाबत माहिती देताना स्थावर विभागाचे अधिकारी राजेंद्र पाटील म्हणाले, यापूर्वी आपण ठराविक कामासाठी नियमानुसार जेवढ्या किंमतीचे काम आहे तेवढी आर्थिक उलाढाल असणे व तश्याच पद्धतीचे आधी काम केलेले असणे या अटी ठेवल्या होत्या. मात्र आता या अटी या टेंडरसाठी शिथिल करण्यात आल्या आहेत.

विद्युत आणि स्थापत्य विभागातील टेंडर हे http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर पाहता येतील. छोट्या व्यावसायिकांना याचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून हे टेंडर काढण्यात आले असून अधिकाधिक व्यावसायिकांनी यात सहभागी व्हावे.  देखभाल व दुरुस्ती च्या मोठ्या कामांऐवजी लहान लहान रु 10 लाखापर्यंत अनेक कामे देण्यात येतील. त्यात कमी बयाना, कमी उलाढाल व कमी अनुभव असला तरी निविदा भरता येईल. अशा प्रकारे अधिकार मंडळाने निर्णय घेतला असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love