प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे निधन

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे आज सोमवारी सकाळी पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात निधन झालं. त्या 78 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या सुमित्रा भावे यांच्यावर उपचार सुरु होते. लेखिका, पटकथा लेखक, निर्मात्या आणि दिग्दर्शक म्हणून त्या चित्रपटसृष्टीत परिचित होत्या. सुमित्रा यांनी आकाशवाणीवर त्या वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले होते.त्यांच्या ‘कासव’ चित्रपटाने ६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘सुवर्ण कमळ ‘ पुरस्कार जिंकला होता.

सुमित्रा भावे यांनी एकूण सुमारे १४ चित्रपट, ५०हून अधिक लघुपट आणि चार दूरचित्रवाहिनी मालिकांचे लिखाण केले होते. त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून पदवी घेतल्यावर पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन विषयात एम.ए. केले. शिवाय त्यांनी मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची ग्रामविकास विषयाची पदविका मिळविली आहे.

शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले होते.पुण्याच्या कर्वे विद्यापीठाच्या समाजसेवा संस्थेत दहा वर्षे प्राध्यापक आणि त्यानंतर सरकारप्रणीत कम्युनिटी अँड स्पॉन्सरशिपच्या त्या कार्यक्रम व्यवस्थापिका होत्या. सुमित्रा भावे यांच्या अनेक समाजकल्याणविषयक शोधपत्रिका प्रकाशित झाल्या आहेत.

झोपडपट्टीतल्या महिलांचं आयुष्य दाखवणारा, १९८५ सालचा ‘बाई’ हा सुमित्रा यांचा पहिला लघुपट होता. हा त्यांच्या ‘स्त्रीवाणी’ या शोधप्रकल्पाचा भाग होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यांचा पुढचा लघुपट ‘पाणी’ यालाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.या चित्रपटांचे दिग्दर्शन..’दिठी’, ‘दहावी फ’, ‘अस्तु’, ‘एक कप च्या’, ‘कासव’, ‘घो मला असला हवा’, ‘जिंदगी जिंदाबाद (हिंदी)’, ‘देवराई’, ‘दोघी’, ‘नितळ’, ‘फिर जिंदगी’ (हिंदी लघुपट), ‘बाधा’, ‘बेवक्त बारिश’ (हिंदी लघुपट). ‘मोर देखने जंगल में’ (हिंदी माहितीवजा कथापट), ‘वास्तुपुरुष’, ‘संहिता’, ‘हा भारत माझा’ या निवडक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *