पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ६ मार्चला पुणे दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते मेट्रोच्या दोन टप्यांचे तसेच अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे.
पुणे महापलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकास कामाच्या उद्घाटनाचा धडाका राजकीय पक्षांनी सुरु केला आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील वेगवान वाहतुकीचे जाळे निर्माण करणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या मेट्रोचे उदघाटन करण्यात येणार आहे. मेट्रोच्या फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय या दोन टप्प्यांचे होणार उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. या दौऱ्यात पंतप्रधानांची जाहिर सभा देखील होण्याची शक्यत वर्तवण्यात आली आहे.
मेट्रोचे काम वेगाने सुरु सद्यस्थितीला वनाझ ते रामवाडी या मार्गावरील मेट्रोचे काम वेगनवान पातळीवर सुरु आहे. या मार्गावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जुलै महिन्यात मेट्रो चाचणी पार पडली होती. सद्यस्थितीला मेट्रोचे कोच डेपोमध्ये दाखल झाले आहेत. कामचा वेग वाढवत येत्या पंधरा दिवसात काम मार्गी लावण्याचे आदेश मेट्रो प्रशासनाला देण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील डीपीआरच्या कामाला सुरुवात वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेच्या अंतर्गत वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यात पुणे मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली. ३ डब्यांच्या २ मेट्रो रेल्वेद्वारे साडेतीन किलोमीटर अंतरात ही चाचणी झाली. मेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसांपूर्वी सरावपूर्व चाचणी घेण्यात आली होती. पुणे शहरातील महामेट्रोच्या पहिल्या ३३ किलोमीटरच्या टप्प्यापैकी १२ किलोमीटर मार्गाचे काम वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होत असतानाच दुसऱ्या टप्प्यासाठी ११३ किलोमीटरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे.