चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट तर्फे होणाऱ्या ७ व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२३ चे पुण्यात आयोजन


पुणे-  चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट तर्फे ७ व्या  आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२३ चे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. मधुमेह असणाऱ्या रूग्णांची संख्या आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतींचा सामना करण्यासाठी योग्य उपाययोजना जाणून घेण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून चिन्मय मिशनचे ग्लोबल हेड स्वामी स्वरूपानंदजी आणि सन्माननीय अतिथी म्हणून नॅशनल केमिकल लॅबोरेटरी,पुणे चे संचालक डॉ.आशिष लेले हे उपस्थित असतील. या परिषदेत  मधुमेहाच्या गुंतागुंतींचे व्यवस्थापन, किफायतशीर दरात मधुमेह उपचार, नवीन प्रगती आणि तंत्रज्ञानाची भूमिका यावर चर्चा करण्यात येणार आहे.

 ७ व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२३ चे आश्रयदाता आणि चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटचे अध्यक्ष लाल चेलाराम म्हणतात की, चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूट ही मधुमेहाचे उपचार, संशोधन, शिक्षण आणि जागरूकता अशा उपक्रमांद्वारे मधुमेहाचा सामना करण्यात अग्रगण्य राहिली आहे.

अधिक वाचा  खासदार राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज अपयशी: पुण्यामध्ये निधन

चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उन्नीकृष्णन एजी म्हणाले की, ७ व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२३ मध्ये प्रख्यात मधुमेह तज्ञ हे मधुमेह उपचार पध्दतींबाबत मार्गदर्शन करतील. ही परिषद एक शैक्षणिक व्यासपीठ आहे.

चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. (ब्रिगेडियर) अनिल पंडित म्हणाले की, चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटमध्ये एकाच छताखाली अद्ययावत सेवा-सुविधा उपलब्ध असून मधुमेह आणि त्यातून निर्माण होणार्‍या गुंतागुंतींचा सामना करण्यासाठी संस्था अग्रस्थानी राहिली आहे.

७ व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२३ चे उद्दिष्ट देशातील आरोग्यसेवेत कार्यरत असणाऱ्यांना मधुमेह आणि त्याच्या गुंतागुंतींबद्दल सर्वसमावेशक ज्ञान प्रदान करणे आहे.

१० ते १२ मार्च २०२३ दरम्यान होणार्‍या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेत २००० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. स्वीडनमधील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूट, अमेरिकेतील मेयो क्लिनिक आणि बार्बरा डेव्हिस सेंटर फॉर डायबेटीस, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर,तसेच युकेमधील युनिव्हर्सिटी ऑफ लिसेस्टर, लंडन मेडिकल कॉलेज, मँचेस्टर युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ एडिंबर्ग, इंपिरिअल कॉलेज लंडन आणि युनिव्हर्सिटी ऑफ डंडी येथील प्रख्यात आंतरराष्ट्रीय वक्ते तसेच ७० हून अधिक भारतातील प्रख्यात प्राध्यापक व संशोधक परिषदेत संवाद साधणार आहेत.

अधिक वाचा  भारतातील या कंपनीची आता नाकाद्वारे घेण्यात येणारी एक खास लस:

चेलाराम फाऊंडेशन डायबेटिस संशोधन पुरस्कार – २०२३ (मुलभूत विज्ञान आणि क्लिनिकल संशोधन श्रेणी) मध्ये ८० हून अधिक युवा संशोधक प्रबंध सादर करतील.

याच परिषदेचा एक भाग म्हणून रविवार १२ मार्च रोजी चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट आणि ब्ल्यू सर्कल डायबेटिस फाऊंडेशन यांच्या तर्फे रन फॉर डायबेटिस – ३ किमी मॅरेथॉनमध्ये टाईप १  डायबेटिस असलेली मुले सहभागी होणार आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love