आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का?- का म्हणाले असे अजित पवार?

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे- शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्याच्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच योगेश केदार आणि इतर तरुणांनी मराठा आरक्षणावरून प्रश्न विचारत त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला. तेव्हा अजित पवार संतापले आणि त्यांनी, शिवजयंतीच्या कार्यक्रमापूर्वी मी तुमच्याशी मराठा आरक्षणविषयी बोललो होतो. तुमचं म्हणणंही ऐकून घेतलं. तरीही तुम्ही बोलत आहात. तुम्ही काय कुणाची सुपारी घेऊन आला का?, आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत अशा शब्दांत खडसावले.

अजितदादांना प्रश्न विचारणारा व्यक्ती हा खासदार संभाजी छत्रपती यांचा पूर्वीचा पीए होता. आज शिवनेरीवर शिवजयंतीच्या कार्यक्रमात मराठा आरक्षणाचा विषय काही तरुणांनी मराठा आरक्षणाचा विषय छेडून अजितदादांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला.  ‘दादा, ५० टक्क्यांच्या आत आरक्षण द्या, असं हे तरुण म्हणाले. त्यामुळे अजितदादा काहीवेळ भडकले. त्यांनी भर सभेतच या तरुणांना कानपिचक्या दिल्या’ केंद्र सरकारने कायद्यात बदल केला आणि ५० टक्क्याहून अधिक आरक्षण देण्याची तरतूद केली, तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, असं अजितदादा म्हणाले. तेव्हा काही तरुणांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला.

 तेव्हा मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का ? असा संतप्त प्रतिप्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरसभेत केला.

काही वेळानंतर त्या व्यक्तीने पुन्हा एकदा अजित पवार यांच्या भाषणात अडथळा आणला. त्यानंतर अजित पवार चिडले. तु कोणाची सुपारी घेऊन आलाय का? असे त्या व्यक्तीला अजित पवारांनी खडसावले. आज शिवजयंती आहे. असे चालणार नाही. असे त्यांनी म्हटले. मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का? पण शिवाजी महाराजांनी काय शिकवलंय? सर्वांना सोबत घेऊन जायलाच शिकवलंय ना? इतर कुठल्या समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची भुमिका असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा सामाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच आमची भुमिका आहे. मात्र, प्रश्न न्यायालयात अडकला आहे. नियमात बदल करून आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारकडून नियमातच बदल करावा लागेल असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *