राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी किंवा निवडणुका हा चांगला पर्याय – सुप्रिया सुळे

नीरा देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक
नीरा देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक

पुणे–राज्यातील वातावरण अस्थिर झालं आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. सरकारमध्ये एकमत नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट (President’s rule) हा एक पर्याय असू शकतो किंवा निवडणुका घेणे हा चांगला पर्याय असू शकतो, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी म्हटलं आहे. दरम्यान, विनयभंग (molestation) झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला म्हणून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra avhad) यांनी राजीनामा देऊ नये असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde)यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. मुंबईच्या गर्दीत धक्का लागणं नित्याचच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा यांचा अनावधानाने महिलेला धक्का लागला असेल. त्यामुळं तत्काळ विनयभंगाची तक्रार दाखल करणं कितपत योग्य?असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

अधिक वाचा  भाजपला केंद्रातील नेते बोलविण्याची वेळ- सचिन अहिर

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गर्दीच्या ठिकाणी मुख्यमंत्री होते, तेथे पोलीस यंत्रणा होती, ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड संबंधित महिलेस म्हणत आहेत की, ‘तू एवढ्या गर्दीत कशाला आली आहेस’ याला महाराष्ट्रात विनयभंग म्हणतात का? हे गलिच्छ राजकारण सुरू आहे, असं मी म्हणेन. हे थांबवण्याची जबाबदारी आमच्यावर नाही, त्यांच्यावर (सरकार) आहे. कारण ते सातत्याने दुखावले जात आहेत.

मंत्री अब्दुल सत्तारांचा उल्लेख न करता सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, कुणी शिवीगाळ करते आहे. महिलेला शिवीगाळ करणं विनयभंग नसतो का? हा एका महिलेचा अपमान आहे. पण याविरोधात मी एक शब्दही बोलले नाही. आजपर्यंत बोलले नाही आणि येथून पुढेही बोलणार नाही, हे सगळे गुन्हे आहेत. महिलांना शिवीगाळ करणं हा गुन्हा आहे. पोलीस ठाण्यात बंदूक घेऊन जाणं, हाही गुन्हा आहे. हा मोठा गुन्हा आहे. मंत्रालयातील पोलिसांना शिवीगाळ करणं, हा आपल्या देशात गुन्हा मानला जातो. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या सेक्रेटरीला शिव्या घालता, हे चालतं का? हा गुन्हा नाही का? असे सवालही सुळेंनी विचारले आहेत.

अधिक वाचा  जागतिक महिला दिनानिमित्त पॅरामोटर्सच्या साह्याने पद्मश्री शीतल महाजनचे 5 हजार फुटावरून स्कायडायविंग : गिनीज बुकसाठी करणार नोंद

“तुमच्या आमदाराने काहीही केलं तर त्यांना ‘सौ खून माफ है’ आम्ही काही केलं नाही तर आमच्यावर गुन्हे दाखल करता. आम्हाला तुरुंगात टाकता. हा कुठला न्याय आहे? यासाठीच ईडी सरकार आलंय का? प्रलोभनं द्या किंवा दडपशाही करा, या दोन गोष्टींवरच हे सरकार सुरू आहे, असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.

माझे वडील मुख्यमंत्री असताना मी मुंबईत बस आणि ट्रेनमधून फिरले आहे. मुंबईत बस आणि ट्रेनमध्ये मोठी गर्दी असते. त्यावेळी धक्काधक्की होत असते. मोठी गर्दी असेल तर असा धक्का लागतो. मुंबईत धक्का लागणं हे नित्याचंच असल्याचे सुळे म्हणाल्या. माझं जितेंद्र आव्हाड यांच्याशी सकाळी बोलणं झालं असल्याचेही सुळे यावेळी म्हणाल्या .जितेंद्र आव्हाड यांना सातत्यानं टार्गेट केलं जात आहे. हे नेमकं का केलं जातय? असा सवाल त्यांनी केला.

अधिक वाचा  #Rahimatpur's unique vision of interfaith equality and social unity : सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक ऐक्याचे रहिमतपुरात अनोखे दर्शन

संजय राठोड प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हायला हवी. संजय राठोड प्रकरण खूप नाजूक आहे. मी पूर्वी पण म्हणत होती की जर त्या मुलीवर अन्याय झाला असेल तर त्याची पारदर्शक चौकशी करण्यात यावी. संजय राठोडांवर पूर्वी पण आरोप केले नव्हते. आता विरोधक असूनही आरोप करणार नाही, असंही त्या म्हणाल्या.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love