विनयभंगाचा कोणताही प्रकार घडला नाही, हे मुख्यमंत्र्यांनीच सांगायला हवं- अजित पवार

We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well
We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well

पुणे– मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ गर्दी होती. तिथे पोलिसही होते. जितेंद्र आव्हाड (jitendra avhad ) फक्त एका भगिनीला बाजुला करुन स्वत: पुढे निघुन गेले. तिथे विनयभंगासारखा (molestation) कोणताही प्रकार घडला नाही. पण जाणीवपूर्वक लोक प्रतिनिधींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांपासून (cm) पाच-दहा फुटांचचं अंतर असेल. तिथे विनयभंगाचा असा कोणताही प्रकार घडला नाही. हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं पाहिजे असेही ते म्हणाले.

काल कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. त्यावर जेव्हा ही घटना घडली तेव्हा गाडीमध्ये मुख्यमंत्री बसलेले होते. त्यांच्यासमोर ही घटना घडली असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी भूमिका स्पष्ट करावी. कसे का होईना, पण तुम्ही मुख्यमंत्री झालेला आहात. तरी राज्यातल्या साडेतेरा कोटी जनतेचं तुम्ही प्रतिनिधीत्व करत आहात. सत्ता येते जाते, सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलेला नाही, जितेंद्र आव्हांडानी राजीनामा देऊ नये. प्रत्येकाने कायद्याचा संविधानाचा, जनतेचा आदर केला पाहिजे. पण जितेंद्र आव्हाडांनी कोणताही विनयभंग केलेला नाही. त्यांच्यावर असा गुन्हा लावण्याचं कोणतही कारण नव्हतं. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी स्पष्टता द्यावी,असं अजित पवार म्हणाले. या पत्रकार परिषदेला विरोधी पक्ष नेते अंबा साहेब दानवे, आमदार सुनील टिंगरे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते.

अधिक वाचा  शिवाजीनगर एसटी बस स्थानकाची उभारणी लवकरच सुरू होणार - आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची माहिती

ज्या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो त्या शरद पवारांनी अनेक चढ उतार पाहिलेत, अनेक स्थित्यंतर पाहिलीत. हे लक्षात घेता आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.  समोर आलेल्या व्हिडिओनुसार, जितेंद्र आव्हाड हे अनेकांना हाताने बाजूला करत होते. त्याच प्रमाणे त्यांनी या महिलेला बाजुला केले. बाकी काही घडलेले नाही. मुख्यमंत्र्यांची कार काही फूट अंतरावरच होती. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढं येऊन विनयभंगाचा प्रकार घडला नसल्याचे सांगायला पाहिजे, असे ते म्हणाले.

राज्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारीचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्याला बगल देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी अशा घटना समोर आणल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले. विवियाना मॉल प्रकरणातील प्रेक्षकाने आव्हाड यांनी मारहाण केली नसल्याचे सांगितले. नियमांचे, कायद्याचे पालन होत नसेल तर कोणत्याही पक्षाचा आमदार का असेना कारवाई झाली पाहिजे असेही ते म्हणाले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love