बाळासाहेब ठाकरे यांची बहिण संजीवनी करंदीकर यांचे निधन

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे : समाजसुधारक प्रबोधकार ठाकरे यांची मुलगी, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची बहिण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आत्या संजीवनी करंदीकर यांचे शुक्रवारी (दि १३) सकाळी वयाच्या ८४ वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. 

संजीवनी करंदीकर या रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियामध्ये सेक्शन अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. जवळपस ३८ वर्ष त्यांनी सेवा बजावली. यानंतर त्या निवृत्त झाल्या होत्या. त्यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी आंतरजातीय विवाह केला. प्रबोधनकार ठाकरे यांना  एकूण  आठ अपत्य होती. त्यात बाळासाहेब ठाकरे यांचा पाचवा तर संजीवनी यांचा सातवा क्रमांक होता. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होतांना  पाहिल्याचा आनंद झाला अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.  विधान परिषदेच्या उपसभापती निलम गो-हे, आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणाल्या, संजीवनी करंदीकर यांचे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी दिर्घकाळ शिवसेनेचा प्रवास जवळून पाहिला. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्या निधनामुळे शिवसेना परिवाराची हाणी झाली आहे.

संजीवनी करंदीकर यांची मुलगी आणि शिवसेना चित्रपट सेनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीस किर्ती पाठक म्हणाल्या, स्वाभिमानाने जीवन कसे जगावे, याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आई होती. तिने एक डायरी केली होती, ज्यात तिने अत्यसंस्काराची देखील तजवीज करुन ठेवली होती, आम्हाला कसलाही त्रास होऊ नये याची तिनं काळजी घेतली होती. तिचं आयुष्यंच प्रेरणादायी  होते असेही पाठक म्हणाल्या.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *