माणसातील बाप्पांप्रती PPCR ची कृतज्ञता


पुणे-आपण सर्वजण सध्या Covid19 (कोरोना) नावाच्या महामारी मुळे त्रस्त झालो आहोत. आपण किंवा आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील व्यक्ती, सोसायटीतील ओळखीचे, आपले नातेवाईक , आपला मित्रपरिवार,  कोणी न कोणी ह्या महामारी ने त्रस्त आहे. ह्या सर्वांना मदत करणाऱ्या खूप संस्था सुद्धा, स्वतःहून आणि दुसऱ्याकडून प्रेरित होऊन मदत कार्यात भाग घेत आहेत. परंतु, अशी ही काही लोकं आहेत , जे त्यांच्या शिक्षणामुळे आणि त्यांनी घेतलेल्या सामाजिक जवाबदारी मुळे वैयक्तिक किंवा हॉस्पिटल्स तर्फे ह्या कार्यात अगदी सुरवाती पासुन झोकून काम करत आहेत, ते म्हणजे डॉक्टर्स. तसेच त्यांच्याबरोबर सिस्टर, मावशी,मामा आणि डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून आपले योगदान देत आहेत.  ह्या महत्त्वाच्या,  म्हणजेच डॉक्टरांच्या व त्यांच्या वैद्यकीय समूहाच्या (सिस्टर , मावशी व मामा) आणि पोलिसांच्या कार्याचे कौतुक करायचे , त्यांच्या कार्याला बळ देण्याचे, त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे महत्त्वाचे कार्य ‘माणसातील बाप्पा’ ही संकल्पना घेऊन  पुण्यातील PPCR (पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड19 रिस्पॉन्स) ही संस्था पुणे महानगरपालिका आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण समितीच्या साहाय्याने मागील चार महिन्यांपासून करीत आहे.

अधिक वाचा  बंद टोलनाक्यांचे सांगाडे हटवा, अन्यथा जाहीर लिलाव करू: छावा मराठा संघटनेचे रामभाऊ जाधव यांचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला इशारा

देऊळ बंद असलं तरी देव क्वारंटाईन नाही, डॉक्टर्स, सिस्टर्स,मामा आणि मावश्यांमध्ये तो साकार आहे, हे देवदर्शन आश्वासक आणि प्रसन्न आहे, ही भावना घेऊन या सर्व ‘माणसातील बाप्पां’प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे कार्य पुणे शहरातील विविध  सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये सुरु आहे.

आपल्याला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला मग ती लहान असो, समवयीन असो किंवा ज्येष्ठ त्यांना काहीही झाले की , पटकन आपण आपल्या डॉक्टर कडे जातो, त्यांना फोन करतो आणि त्यांची मदत घेतो. वेळी अवेळी, आपले डॉक्टर्स आपल्यासाठी त्यांचे ज्ञान व वेळ देत असतात. त्यांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे बऱ्याच वेळेला आपल्या जवळच्या व्यक्तीला जीवदानही मिळते. आणि आपण आपसूक म्हणून जातो की तुम्ही अगदी देवा सारखे आलात आणि त्या व्यक्तीचे प्राण वाचले.

अधिक वाचा  माइण्‍ड वॉर्सच्‍या नॅशनल अकॅडेमिक चॅम्पियनशीपला भारतभरातून मिळाला सकारात्‍मक प्रतिसाद

अशा परिस्थितीत देवा नंतर आपण जर कोणाला देव मानतो तर ते म्हणजे डॉक्टर्स. असेच काही डॉक्टर्स आहेत आपल्या भागातील  डॉक्टर्स किती तरी तास (जवळ जवळ १८ ते २४ तास) PPE_kit घालून येणाऱ्या कोरोना रुग्णांची तपासणी , औषधोपचार करत आहेत. कोरोना बरोबर इतरही आजार असलेले रुग्ण येतायेत , त्यांचीही पूर्ण तपासणी व औषधोपचार इथे चालू आहे. त्यांच्या ह्या कर्तव्याला आपण एक सलाम केलाच पाहिजे या भावनेतून ह्या महत्त्वाच्या,  म्हणजेच डॉक्टरांच्या व त्यांच्या वैद्यकीय समूहाच्या ( Sisters , मावशी व मामा) कार्याचे कौतुक करायचे , त्यांच्या कार्याला बळ देण्याचे , त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे महत्त्वाचे कार्य  PPCR (पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड19 रिस्पॉन्स) पुणे महानगरपालिका आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण समितीच्या साहाय्याने  करीत आहे.

अधिक वाचा  अंगणवाडी महिला सेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन : पंकजा मुंडे यांची चौकशी करण्याची मागणी

देऊळ बंद असलं तरी देव क्वारंटाईन नाही, डॉक्टर्स, सिस्टर्स,मामा आणि मावश्यांमध्येतो साकार आहे, हे देवदर्शन आश्वासक आणि प्रसन्न आहे, ही भावना घेऊन या सर्व ‘माणसातील बाप्पां’प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे कार्य पुणे शहरातील विविध  सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये सुरु आहे.

 PPCR ची निर्मिती पुणे शहरातील प्रमुख औद्योगिक संस्था आणि MCCIA यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्म द्वारे वेगवेगळ्या प्रकारची मदत पुणे शहरातील हॉस्पिटल covid मदत केंद्रांना करण्यात येत आहे.

कोरोना संक्रमणाचा विस्तार आणि त्याने झालेली हानी पाहता जगभरातील डॉक्टर्स ह्यावरील उपाय शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या ह्या कार्याला नक्की यश मिळेल व आपले जग लवकरच कोरोना मुक्त होईल , अशी आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करूयात.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love