स्वावलंबन फाऊंडेशन प्रस्तुत अष्टभुजा स्त्री सन्मान पुरस्कार सोहळा पुणे येथे जल्लोषात संपन्न

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- स्वावलंबन फाउंडेशनच्या वतीने निरपेक्ष भावनेने महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या महिलांना अष्टभुजा स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान करून  सन्मानित करण्यात आले. निवड झालेल्या अष्टभुजा सौ.अपर्णा खोत-पुणे, .सौ.पूजा इंदुलकर-मुंबई, सौ.जान्हवी अस्लेकर-मुंबई, सौ.अनुजा कुलकर्णी-पुणे, सौ.सोनाली कोदे-वाई, सौ.सोनाली नाईक,नाशिक, सौ.पूनम मोहिते-काशीद नाशिक आणि सौ.रश्मी लुडबे,कोकण आणि आदि मान्यवरांचा सत्कार करून यावेळी सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप पुणेरी पगडी, शेला आणि सन्मानपत्र असे होते.

डॉ.हर्षिदा चंदवानियाज् फार्म हाऊस,नंदनवन सोसायटी,डोणजे गाव,सिंहगड रोड,पुणे येथे हा सोहळा संपन्न जाळला. स्वावलंबन फाउंडेशनचे अध्यक्ष संजयजी पोवळे आणि सचिव सौ.विभा अतुल परब, अलिबाग महिला काँग्रेस अध्यक्ष सौ.श्रध्दाजी ठाकूर, माजी आमदार स्व.तुकाराम सुर्वे समाजसेवी संस्था कर्जत अध्यक्ष सौ.मनिषाजी सुर्वे या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत हा सोहळा कोरोना बाबत शासकीय सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून अतिशय शिस्तबद्ध पणे पार पाडण्यात आला.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून महिला एकत्र येऊन त्यांच्या समवेत हा सोहळा अतिशय दिमाखदारपणे पार पाडण्यात आला. अगदी  तळागाळापासून उच्च विद्याविभूषीत महिला, महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी एकत्रितपणे महाराष्ट्र आणि बाहेरही सक्षमीकरणाचे उदात्त कार्य करत असून त्यांचा सन्मान करणे स्वावलंबन फाउंडेशन आपले आद्य कर्तव्य मानते.

प्रतिमपूजन आणि दीपप्रज्वलन सचिव विभा अतुल परब, महाराष्ट्र जनसंपर्क प्रमुख अंजली ब्रम्हे , कार्यकारी विश्वस्त आणि गुजरात स्वावलंबन एलिट क्लब प्रेसिडेंट हर्षिदा चांदवनिया,खजिनदार वनिता चव्हाण, मुख्य विश्वस्त मानसी वेदक यांच्या हस्ते करण्यात आले.

सर्व पदाधिकऱ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन आगामी येणारे नवीन उपक्रम,योजना आणि प्रकल्प यांची माहिती आपल्या अध्यक्षीय मनोगतातून अध्यक्ष संजयजी पोवळे यांनी दिली.

अष्टभुजा पदाधिकाऱ्यांच्या कार्याची माहिती देत महिला सक्षमीकरणाची नितांत आवश्यकता असून समाजातून अशी उत्तुंग व्यक्तिमत्व समोर आणून सुदृढ समाज निर्माण होणे कसे आवश्यक आहे याची माहिती सचिव विभा अतुल परब यांनी आपल्या मनोगतातून दिली.

या सोहोळ्यासाठी,महाराष्ट्र बाजार पेठ, पलाश हेल्थ ब्युटी फॅशन, ट्रायनेट कम्युनिकेशन, कॉर्टो फिल्म्स , मेगा गृहिणी उद्योग, संस्कृती उत्पादने, ऋतू फूड्स, जायका चहा, श्री गणेश क्रिएशन, माइंड क्राफ्ट, अनुप्स एंटरप्रायजेस या प्रायोजकांचे आणि अन्य सहप्रायोजकांचे मोलाचे योगदान मिळाले.

कार्यक्रमाचा हेतू आपल्या प्रास्तविकातून भावना आंबेटकर यांनी स्पष्ट केला. पाहुण्यांचा परिचय पद्मा कांबळे यांनी करून दिला. सुवर्णा काकुस्ते आणि मानसी केतकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभारप्रदर्शन अमृता भोसले यांनी मांडले.

कृपा श्रोत्रीय, संस्कृती कुंभार,अनुराधा आहिरे, दीपाली पाठक आणि ममता बागेवाडी ,दीक्षा कोदे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

कोमल पारेख,गायत्री मराठे,योगिता बडवे, प्राजक्ता पेंढारकर,विद्या गोकर्णकर,शिल्पा दणगे,प्रांजल मोहिते, सोनिया कांबळे यांचे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य मिळाले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *