मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने 65 वर्षीय व्यक्तीची इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या

A 65-year-old man committed suicide by jumping into the Indrayani river as the Maratha community was not getting reservation
A 65-year-old man committed suicide by jumping into the Indrayani river as the Maratha community was not getting reservation

पुणे–मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आणि मुलाला अनुकंपावर नोकरी मिळेना. या नैराश्यातून व्यंकट ढोपरे या ६५ वर्षीय व्यक्तीने आळंदी येथे इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. व्यंकट ढोपरे हे सध्या पुणे जिल्ह्यातील नऱ्हे आंबेगाव येथे वास्तव्यास होते. ते मूळचे लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उमरदरा या गावचे माजी सरपंच आहेत.

पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदीत त्यांचा आज मृतदेह आढळला. नऱ्हे आंबेगाव येथून काल ते दर्शनासाठी आळंदीत आले होते. सकाळी अकराच्या सुमारास ते तिथून निघाले. त्यांच्या कुटुंबियांना घरातच एक चिठ्ठी सापडली. त्यातून त्यांनी आरक्षण मिळत नसल्याने टोकाच पाऊल उचलल्याचं स्पष्ट झालं आहे.

शुक्रवारी रात्री ८ च्या दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन दलास पाचारण करण्यात आले. व शोध मोहीम सुरू झाली. जुन्या बंधाऱ्याच्या नदी पात्रात आळंदी नगरपरिषदेच्या आग्निशमन दल, पिंपरी चिंचवड अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापना मार्फत बोटीच्या सहाय्याने काल (दि.२७) रात्री उशिरा पर्यंत त्यांची शोध मोहीम सुरू होती.

अधिक वाचा  ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती : मुरलीधर मोहोळ

शनिवारी (दि. २८) सकाळी पुन्हा एकदा बंधाऱ्यात शोध मोहिमेचे काम सुरू झाले.  दुपारी एक-सव्वा एकच्या दरम्यान जुन्या बंधाऱ्याच्या पाण्यात त्यांचा हात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. स्वतःचे हात बांधून त्यांनी बंधाऱ्यात आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.

ढोपरे यांनी सुसाईड नोटमध्ये लिहले आहे, की मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. मी सरपंच असल्यापासून प्रयत्न करतो आहे, तरी सरकार याला गांभीर्याने घेत नाही. तसेच २०१२ पासून माझ्या मुलाला अनुकंपावर नोकरी दिली जात नाही. मुलाच्या आईच्या वडिलांच्या जागी त्याला नोकरी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. पण प्रशासन आम्हाला न्याय देत नाहीत. याच नैराश्यातून मी आत्महत्या करीत आहे.

ही चिठ्ठी पाहून कुटुंबियांना धक्का बसला आणि त्यांनी भोसरीत राहणाऱ्या जावयास याबाबत कळवले. तेव्हा आळंदीत त्यांचा  शोध घेताना बंधाऱ्यालगत त्यांची पिशवी, मोबाईल, गळ्यातील माळ, बूट आणि ज्ञानेश्वरीमधील काही कागद आढळली.त्याच बंधाऱ्यात पोलीस ,अग्निशमन दल, शोध सुरू झाला. आज दुपारी तिथंच त्यांचा मृतदेह आढळला. त्यांना पोहायला येत असल्याने त्यांनी स्वतःच स्वतःचे हात बांधून इंद्रायणी नदीत उडी घेतल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love