पुण्यात सर्व प्रकारची दुकाने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत उघडी राहणार


पुणे—कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा झालेल्या उद्रेकाच्या  पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन 15 जूनपर्यन्त वाढवण्यात आला आहे. त्याचवेळी ज्या ठिकाणी कोरोनाची संख्या आटोक्यात आली आहे त्याठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहे. पुण्यातील गेल्या काही दिवसातील कोरोनाबाधित रुग्णांची घटती लोकसंख्या पाहता, व्यापाऱ्यांनी सर्व दुकाने सुरू करण्याची  आणि दुकानांची उघडे ठेवण्याची वेळ वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार पुण्यातील सर्व प्रकारची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परबंगी देण्यात आली आहे. शनिवारी रविवारी मात्र केवळ अत्यावश्यक सेवांमधील दुकाने उघडी राहणार आहेत.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.      

पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सोमवारी ते शुक्रवारी सुरू राहतील. तर, शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांमधील दुकाने सुरू राहणार आहेत. याशिवाय, शहरातील उद्यानं, व्यामशाळा (जिम) बंद राहणार आहेत. तर हॉटल आणि बार उघडे राहणार असले तर तिथे फक्त पार्सल सेवा  सुरू राहणार आहे.

अधिक वाचा  माइण्‍ड वॉर्सच्‍या नॅशनल अकॅडेमिक चॅम्पियनशीपला भारतभरातून मिळाला सकारात्‍मक प्रतिसाद

पुढील दहा दिवसांसाठी हा आदेश असणार आहे. आता २ वाजेपर्यंत नागरिकांच्या दृष्टीने सर्व सेवा सुरू राहणार आहेत. त्यानंतर दुपारी तीननंतर शहरात संचारबंदी असेल. त्यामुके त्यानंतर नागरिकांनी बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.  पीएमपीएमएल बस सेवा फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍यांसाठी सुरू राहणार आहे, इतर नागरिकांना त्याद्वारे प्रवास करता येणार नाही असे मोहोळ यांनी सांगितले.

१५ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतचे या संदर्भातील सुधारित आदेश पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी परिपत्रकाद्वारे निर्गमित केले आहे.

  • त्यानुसार सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवामधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहतील.
  • पुणे मनपा क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरू राहतील.
  • पुणे मनपा क्षेत्रातील अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ वाजपेर्यंत सुरू राहणार आहेत. रेस्टॉरंट व बार हे केवळ पार्सल व घरपोच सेवेसाठी सुरू राहतील.
  • ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांची घरपोच सेवा सुरू करण्यास मूभा राहील.
  • दुपारी ३ वाजेनंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण, अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णत: प्रतिबंध राहील.
  • सर्व शासकीय कार्यालये २५ टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील.
  • आठवड्यातील सर्व दिवस मद्य विक्रीची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजपेर्यंत सुरू राहतील.
100% LikesVS
0% Dislikes

Spread the love