पुणे– ग्राहकांवर अतिरिक्त भार टाकत सर्वसामान्य ग्राहकांना विज वितरण कंपनीने विजेचा शॉक दिला असून भूलथापा देणार्या सरकारने जनतेची माफी मागावी व दिलेल्या शब्दाप्रमाणे वीज बिल माफ करावे आणि वारंवार शब्द फिरून लोकांची फसवणूक करणाऱ्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.
वाढीव वीज बिलांच्या विरोधात निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या झोपडपट्टी आघाडीच्या वतीने भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज रास्ता पेठेतील एमएसईबी कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, दत्तात्रय खाडे, महिला अध्यक्ष अर्चना पाटील, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पुनीत जोशी, रवी साळेगावकर, प्रमोद कोंढरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुळीक म्हणाले, ‘गेल्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये वीज वितरण कंपनीने ग्राहकांना नियमित वीज बिले दिली नाहीत.दरम्यानच्या काळामध्ये वीज मीटरची रिडींग घेण्यासाठीही कधी कोणी फिरकले नव्हते. ग्राहकांवर अतिरिक्त भार टाकत सर्वसामान्य ग्राहकांना विज वितरन कंपनीने विजेचा शॉक दिला असून भूलथापा देणार्या सरकारने जनतेची माफी मागावी व दिलेल्या शब्दाप्रमाणे वीज बिल माफ करावे आणि वारंवार शब्द फिरून लोकांची फसवणूक करणाऱ्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा.’
ते पुढे म्हणाले, ‘1 ते 100 युनिट पर्यंत विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना वीज वितरण कंपनी 3 रुपये प्रति युनिट प्रमाणे वीज बील आकारते तर शंभर युनिटचे वर वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रतियुनिट सात रुपयाचे दर आकारले जातात तर हजार युनिट च्या पुढे वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना बारा रुपये युनिट प्रमाणे बिल आकारले जाते मात्र कोरोणा संकटाच्या काळामध्ये पाच ते सहा महिने कुठल्याही प्रकारची रिडींग न घेता गेल्या महिन्याभरापूर्वी रिडींग घेऊन सर्वसामान्य ग्राहकांनी वापरलेले शंभरच्या वरचे जे युनिट आहेत ते पाच महिन्यात वापरले होते मात्र प्रत्येक महिन्याला वीज बिल न दिल्यामुळे या ग्राहकांना तीन रुपया ऐवजी सात रुपये युनिटप्रमाणे वीज बिलाचा भरणा करावा लागत आहे तर 300 ते 400 च्या पुढे प्रतिमहिना युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना हजार च्या पुढे युनिट वापरानंतर विज बिल दिल्यामुळे त्यांना बारा रुपये युनिट प्रमाणे वीज दर आकारला गेला असून त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वीज वितरण कंपनी लुटून खात आहे. ऊर्जामंत्री मात्र केंद्रावर आरोप करण्यात व्यस्त आहेत प्रत्यक्षात स्वतः मात्र कोणतीही कृती करताना दिसत नाहीत त्यामुळे हे सरकार जनतेप्रती कृतघ्न आहे.’
मुळीक पुढे म्हणाले, ‘वीज वितरण कंपनीने सुद्धा ग्राहकांचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता केवळ आणि केवळ सरकारच्या इशार्यावर नाचत सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरुन अव्वाच्या सव्वा बिले देण्यात आली आहे त्यात आलेली दरमहा आलेली नसून तब्बल सहा सात महिन्यांनंतर विज बिल देण्यात आले आहे त्यामुळे प्रति युनिटचा दर देखील वाढून आला आहे त्यासाठी सर्वसामान्य ग्राहक जबाबदार नसून हेतुपुरस्सर ऊर्जा मंत्र्यांचा आणि ऊर्जा विभागाच्या सांगण्यावरून ही वीज बिले वाढीव स्वरूपात उत्तर देण्यात आली नाहीत ना असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकाला पडला आहे विज वितरन कंपनीने हा सावळा गोंधळ थांबवत विज ग्राहकांना न्याय द्यावा अन्यथा आज केवळ वीज बिलांची होळी केली आहे यापुढे सरकार ताळ्यावर न आल्यास यापेक्षाही आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल.’