ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच एक नंबरचा पक्ष; फडणवीसांचा पुन्हा दावा

राजकारण
Spread the love

पुणे – नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वात मोठी ठरली आहे. साडे पाच ते सहा हजार ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आली आहे. तीन पक्ष एकत्र असूनही एवढ्या ग्रामपंचायतीत निवडून येवू शकते नाहीत. तीन पक्ष एकत्र आले तरी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष झाला आहे असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपतर्फे अनुसूचित जमाती , आदिवासी मोर्चाच्या वतीने आज (शुक्रवारी) प्रदेश पदाधिकारी, कार्य समिती बैठक, मेळाव्याचे आयोजन केले होते. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात झालेल्या मेळाव्यात फडणवीस बोलत होते.

“राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. तिन्ही पक्ष तीन दिशेने चालले आहेत. सरकारची अवस्था अत्यंत वाईट आहे. एकाच कोचवर तिघे बसण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या कोचवर आपण एकटे असून आपल्याला भरपूर जागा तयार होत आहे. त्यामुळे राजकीय स्पेस मिळत आहे. त्याचा प्रत्यय ग्रामपंचायत निवडणुकीत आला असून ग्रामपंचायच निवडणुकीमध्ये सहा हजार ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. ग्रामपंचायतीत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष असल्याचं,” देवेंद्र फडणवीस म्हणाले. .

राज्य सरकारला खरेदीचा शौक असल्याने तांत्रिक समितीने मान्यता दिल्यानंतरही आदिवासी समाजातील नागरिकांच्या थेट खात्यात अनुदान दिले जात नाहीत. कारण, खरेदीत माल मिळतो. कोणाला किती माल मिळेल यावरून सरकार मधील तीन पक्षामध्ये भांडणे आहेत. यांच्या भांडणात आदिवासी समाज विविध योजनांपासून वंचित राहत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच दोन लोक बसण्याची जागा नाही अशा सोफ्यावर तिघे जण बसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपल्याकरिता मोठ्या प्रमाणात राजकीय स्पेस मिळत असून त्याचा प्रत्यय ग्रामपंचायत निवडणुकीत आला, असेही ते म्हणाले.

भाजप सरकारच्या काळात आदिवासी समाजासाठी मोठे काम करण्यात आले. समाजावरील 175 कोटींचे कर्ज माफ करण्यात आले.पेसा अंतर्गत आदिवासी समाजाला थेट पद्धतीने अनुदान देण्यास सुरुवात केली. मात्र, आम्ही घेतलेले निर्णय या सरकारने बंद केले. हा अधिकार त्यांना कोणी दिला, या सरकारला फक्त खरेदीत रस आहे. थेट अनुदान नाकारून आदिवासी समाजासाठी वस्तू खरेदीचा घाट सरकारने घातला आहे असा आरोप त्यांनी केला.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वात मोठी ठरली आहे. साडे पाच ते सहा हजार ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आली आहे. तीन पक्ष एकत्र असूनही एवढ्या ग्रामपंचायतीत निवडून येवू शकते नाहीत. तीन पक्ष एकत्र आले तरी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष झाला आहे. म्हणून घाबरून जाण्याचे कारण नाही. देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. भारतीय जनता एक मजबूत पार्टी आहे. देशात अनुसूचित जातीचे सर्वाधिक खासदार, आमदार भाजपचे आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

 हे ठराव केले पारित!

पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदिवासी विकास कार्याबाबत अभिनंदन ठराव प्रदेश महामंत्री तथा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रकाश गेडाम यांनी मांडला. नवीन सुधारित कृषी विधेयक 2020 ठराव खासदार डॉ. भारती पवार यांनी मांडला. तर 15 नोव्हेंबर हा भगवान बिरसा मुंडा जयंती दिवस राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस घोषित करणे, सुट्टी जाहीर करणे आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याबाबतचा ठराव खासदार अशोक नेते यांनी मांडला. तीनही ठराव पारित करण्यात आले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *