विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत पुन्हा एकदा मतभेद: कोण होणार विधानसभा अध्यक्ष?


मुंबई- कॉँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले होते. नाना पटोले यांची कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदी निवड झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीने या पदावर दावा सांगितला त्यामुळे कॉँग्रेस आक्रमक झाली आणि विधानसभा अध्यक्ष पदावर कॉँग्रेसचाच हक्क असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, विधानसभेचे प्रभारी अध्यक्षपद राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आहे.

आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत काँग्रेसने अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात घ्यावी ही भूमिका मांडली आहे. मंगळवारी सकाळी विधानभवनात याबाबत काँग्रेसची बैठक आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी मात्र त्यासाठी अनुकूल नाही. अर्थसंकल्प चर्चा आणि तो मंजूर करून घेणे हे सरकारचे प्राधान्य आहे, त्यामुळे तूर्तास निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी तयार नाही अशी त्यांची भूमिका आहे. तर निवडणूक व्हावी म्हणून काँग्रेस आग्रही आहे.

अधिक वाचा  उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदें यांना सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नव्हत्या- दिलीप वळसे पाटील

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत चर्चा सुरु आहेत. या शर्यतीत आमदार पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत, सुरेश वरपुडकर, संग्राम थोपटे आणि के. सी. पाडवी यांच्या नावाची चर्चा असून संग्राम थोपटे यांची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love