देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या आणि मला चंपा म्हणतात ते चालते का?


पुणे—भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अभ्यास नसलेले छोटे नेते अशा शब्दांत टीका केल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युध्द पेटले आहे. शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर आता पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी टीका करून शरद पवार यांचा अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता. मात्र तुम्ही मोदींवर, अमित शहांवर बोललेले चालते. तुमचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या आणि मला चंपा म्हणतात ते चालते का? असा प्रतिसवाल केला आहे.

शरद पवार हे अभ्यास नसलेले छोटे नेते आहेत, राजकारणात येण्यापूर्वी ते मला मोठे नेते वाटायचे. मात्र प्रत्यक्षात ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. पवार साहेबांबाबत बोलण्याएवढी आपली किंमत आहे का, असा टोला अजित पवार यांनी लगावला होता तर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीसुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या टीकेचा समाचार घेतला होता. शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये. तुम्ही निखारा टाकलात तर आम्ही वणवा पेटवू, असा इशारा अमोल कोल्हे यांनी विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या प्रचारसभेत केला होता, त्या पार्श्वभूमीवर बोलताना पाटील यांनी वरील टीका केली.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक:राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड महाविकास आघाडीचे उमेदवार

 .

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love